मोठी बातमी, मुंबईत आता वाहनांना मिळणार कलर कोड!

मोठी बातमी, मुंबईत आता वाहनांना मिळणार कलर कोड!

तिन्ही रंगाचे कोड हे मुंबई पोलीस आणि स्थानिक पोलीस देणार आहे. जर या कलर कोडचा दुरुपयोग केल्यास कलम 419 नुसार कारवाई केली जाणार आहे.

  • Share this:

मुंबई, 17 एप्रिल : मुंबईसह (Mumbai) राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे कडक निर्बंध लावण्यात आले आहे. पण, तरीही रस्त्यावरील वाहतूक कमी होण्याचे नाव नाही. त्यामुळे आता मुंबईतील रस्त्यावर फिरणे आता आणखी कठीण होणार आहे. कारण, पोलिसांकडून गाड्यांना वेगवेगळ्या रंगाचे कोड (color code for bike and car in mumbai) देण्यात येणार आहे.

यापुढे आता मुंबईत खाजगी वाहनांवर 3 प्रकारचे कलर कोड लागणार आहे.  कलम 144 नुसार मुंबई शहरात फक्त विशिष्ट कलर कोड असलेल्या गांड्यांनाच परवानगी दिली जाणार आहे.

शक्तिमानमधील खलनायकाला कोरोनाची लागण; डॉ. जयकॉल मागतोय प्लाझ्मा

यापुढे अत्यावश्यक वाहनांवर पिवळ्या रंगाचा कोड असणार आहे.  तर मेडिकल सेवा वाहनांवर लाल रंगाचा कोड असणार आहे. जीवानावश्यक सेवेतील भाज्यांचा वाहनांवर हिरव्या रंगाचे कोड असणार आहे.

साडेतीन वर्षांनी लालू प्रसाद तुरुंगातुन येणार बाहेर, मात्र इतर आरोपांचं काय?

तिन्ही रंगाचे कोड हे मुंबई पोलीस आणि स्थानिक पोलीस देणार आहे. जर या कलर कोडचा दुरुपयोग केल्यास कलम 419 नुसार कारवाई केली जाणार आहे.

मुंबईत कडक लॉकडाऊनचे महापौरांनी दिले संकेत

दरम्यान,  मुंबईतील परिस्थिती सर्वाधिक भयंकर आहे. शुक्रवारी एका दिवसात तब्बल 9 हजार जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. अशात आता वाढत्या कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता मुंबईमध्ये पुन्हा एकदा लॉकडाऊन (Lockdown in Mumbai) लावलं जाणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. स्वतः महापौर किशोरी पेडणेकर (BMC Mayor Kishori Pednekar) यांनी मुंबईतील परिस्थिती पाहाता, हा एकच पर्याय उरला असल्याचं म्हटलं आहे.

IPL 2021 : रवीवारपासून आयपीएलचे 'डबल हेडर' सुरू, मुंबई खेळणार 3 सामने

किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, 'मुंबईमध्ये तब्बल 95 टक्के लोक नियमांचं पालन (COVID19 Restrictions) करत आहेत. मात्र, केवळ 5 टक्के लोक असे आहेत, जे नियमांचं पालन करत नाहीत. त्यांच्यामुळे इतरांनाही त्रास सहन करावा लागत आहे. मला असं वाटतं, की कोरोनाची सध्याची स्थिती पाहाता मुंबईमध्ये संपूर्ण लॉकडाऊन केलंच पाहिजे.'

Published by: sachin Salve
First published: April 17, 2021, 7:14 PM IST
Tags:

ताज्या बातम्या