एपीएमसीत भाज्या झाल्या स्वस्त

एपीएमसीत भाज्या झाल्या स्वस्त

बाजारात भाज्यांची विक्रमी आवक झाल्याने भाव 30 टक्क्यांनी खाली आलेत. दररोज सरासरी 500 ते 550 गाड्यांची आवक होते. आज ही आवक 850 गाड्यांवर गेली आहे.

  • Share this:

04 सप्टेंबर : आज एपीएमसीमध्ये भाज्यांचे भाव घसरले आहेत. बाजारात भाज्यांची विक्रमी आवक झाल्याने भाव 30 टक्क्यांनी खाली आलेत. दररोज सरासरी 500 ते 550 गाड्यांची आवक होते. आज ही आवक 850 गाड्यांवर गेली आहे.

गणेशोत्सव, पाऊस आणि सुट्यामुळे आज शेतकऱ्यानी शेतातला शेतमाल बाजारात पाठवल्याने आवक वाढलीये.  वर्षभरातली अशा पद्धतीने विक्रमी आवक होण्याची ही दुसरी वेळ.

या मार्केटमधून मुंबई, मुंबई उपनगर आणि ठाणे शहराला भाजी पुरवठा केला जातो.

एपीएमसी बाजारपेठेत घसरलेले भाव

भेंडी - 22 रु किलो

फरसबी - 20 रु किलो

गाजर - 16 रु किलो

कारली - 25 रु किलो

मिरची - 22 रु किलो

वाटाणा - 40 रु किलो

वांगी - 15 रु किलो

कोथिंबीर - 15 रु जुडी

टोमॅटो - 24 रु किलो

First published: September 4, 2017, 2:01 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading