पितृपक्ष आणि अतिवृष्टीमुळे भाज्या महागल्या

पितृपक्ष आणि अतिवृष्टीमुळे भाज्या महागल्या

गेल्या दोन आठवड्यात भाज्यांच्या दरात २० टक्क्यांनी वाढ झालीय.

  • Share this:

प्राजक्ता पोळ-शिंदे, मुंबई,10 सप्टेंबर :  पितृपक्ष आणि अतिवृष्टीमुळे  भाज्यांचे दर मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. पितृपक्षात लागणाऱ्या भाज्या १५ ते २० रूपयांनी महागल्या आहेत. त्यामुळे सामान्यांच्या खिशाला कात्री लागतेय.

'मी घरकाम करते. बाजारात भाजी घ्यायला आल्यावर दर बघितले की चक्कर येते,' ही प्रतिक्रिया आहे बाजारहाट करायला आलेल्या एका स्त्रीची.

भाज्यांचे दर हे प्रत्येक आठवड्याला वाढतायेत. गेल्या दोन आठवड्यात भाज्यांच्या दरात २० टक्क्यांनी वाढ झालीय. या आठवड्यातील भाज्यांच्या दरावर आपण एक नजर टाकूयात-

गवार - ६० रु. किलो

भेंडी - ६० रु. किलो

फ्लॉवर - ६० रु. किलो

मटार - ८० रु. किलो

कोथिंबीर - ४० रु. जुडी

कांदा - ४५ रु. किलो

लसूण - १६० रु. किलो

सध्या पितृपक्ष सुरू आहे. काही दिवसांवर नवरात्र आहे. या अशा सणावाराच्या दिवसांत भाज्या महागल्यामुळे सर्वसामान्य कुटुंबीयांचं पूर्ण बजेट कोलमडल्याचं गृहिणी सांगतायत.

अतिवृष्टीमुळे भाजी कमी येत असल्यामुळे भाव वाढले आहेत. तर दलालांमुळे कृत्रिम तुटवडा होत असल्याचं विक्रेत्यांचं म्हणणं आहे.

पावसाच कारण असो किंवा इतर काही... महागाईला सामान्य माणसं कंटाळली आहेत. म्हणूनच हेच का अच्छे दिन हा प्रश्न ते विचारतायेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 10, 2017 02:09 PM IST

ताज्या बातम्या