भाजी विक्रेत्याकडून ग्राहकाचा खून; 10 रुपयांच्या वादावरून मुंबईतील घटना! Dadar | Mumbai

मध्य रेल्वेच्या दादर रेल्वे स्थानकाबाहेर सोमवारी रात्री एका भाजी विक्रेत्याने ग्राहकाचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

News18 Lokmat | Updated On: Jun 25, 2019 10:25 AM IST

भाजी विक्रेत्याकडून ग्राहकाचा खून; 10 रुपयांच्या वादावरून मुंबईतील घटना! Dadar | Mumbai

मुंबई, 25 जून: मध्य रेल्वेच्या दादर रेल्वे स्थानकाबाहेर सोमवारी रात्री एका भाजी विक्रेत्याने ग्राहकाचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. केवळ 10 रुपयांच्या वादावरून ही घटना घडल्याचे प्राथमिक वृत्त आहे. यासंदर्भातील एएनआय वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार खून करून भाजी विक्रेता फरार झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

दादर रेल्वे स्थानकाबाहेर भाजी विक्रेता सोनीलाल आणि ग्राहक मोहम्मद हनीफ यांच्यात वाद झाला. हा वाद इतक्या टोकाला गेला की सोनीलालने रागाच्या भरात मोहम्मदला चाकूने भोकसले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या मोहम्मदला तातडीने केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण उपचारा पूर्वीच त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना घडल्यानंतर भाजी विक्रेता सोनीलाल याने तेथून पळ काढला.

काय झालं नेमकं

Loading...

शिवाजी नगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मोहम्मद रात्री 11च्या सुमारास भाजी खरेदी करण्यासाठी दादर स्थानका बाहेर आला होता. 10 रुपयांवरून त्याचे आणि सोनीलालचा वाद झाला. हा वाद इतक्या टोकाला गेला की, सोनीलालने चाकूने मोहम्मदच्या गळ्यावर आणि हातावर अनेक वेळा वार केले. या हल्ल्यात मोहम्मद गंभीर जखमी झाला.

पोलिसांनी फरार सोनीलालविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. शिवाजी नगर पोलिसांचे पथक त्याचा शोध घेत आहेत.

VIDEO: मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वे दीड तासासाठी बंद

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 25, 2019 09:59 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...