कल्याण एपीएमसीत एकही गाडी फिरकली नाही, एका रात्रीत भाज्यांचे भाव तिप्पट

कल्याण एपीएमसीत एकही गाडी फिरकली नाही, एका रात्रीत भाज्यांचे भाव तिप्पट

कल्याण एपीएमसीमध्ये आज भाजीपाल्याची एकही गाडी दाखल झाली नाहीये. त्यामुळे व्यापाऱ्यांनी काल शिल्लक राहिलेला भाजीपाला आज विकून आजचा दिवस ढकललाय, मात्र उद्या काय?

  • Share this:

प्रदीप भणगे, कल्याण

02 जून : शेतकऱ्यांच्या संपाचा आजचा दुसरा दिवस असून  खऱ्या अर्थानं शहरातल्या नागरिकांना याचा फटका बसणार आहे. कारण कल्याण एपीएमसीमध्ये आज भाजीपाल्याची एकही गाडी दाखल झाली नाहीये. त्यामुळे व्यापाऱ्यांनी काल शिल्लक राहिलेला भाजीपाला आज विकून आजचा दिवस ढकललाय, मात्र उद्या काय? असा प्रश्न सर्वांनाच पडलाय.

कल्याण एपीएमसीत कालच्या तुलनेत आज भाज्यांचे भाव तिप्पट झाले असून त्यामुळे सर्वसामान्यांच्या तोंडचं पाणी पळणार आहे. मात्र सकारात्मक बाब म्हणजे एकीकडे माल नसला तरी व्यापा-यांनी शेतकऱ्यांच्या संपाला पाठिंबा दिलाय.

भाज्यांचे वाढलेले भाव - प्रतिकिलो

  काल आज
शिमला मिर्ची 30 80
काकडी 10 16
फ्लॉवर 8 30
टोमॅटो 20 50
भेंडी 30 35
तोंडली 15 20

First published: June 2, 2017, 10:14 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading