वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्याला शिवसेना नगरसेकाकडून मारण्याची धमकी

वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्याला शिवसेना नगरसेकाकडून मारण्याची धमकी

शिवसेना नगरसेवक शैलेश पाटील यांच्याकडून शिवीगाळ आणि मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.

  • Share this:

कल्याण, 17 फेब्रुवारी : दिवा शहरातील सामाजिक कार्यकर्ते आणि वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी अमोल केंद्रे यांना शिवसेना नगरसेवक शैलेश पाटील यांच्याकडून शिवीगाळ आणि मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. अमोल केंद्रे यांनी याबाबतचा व्हिडिओही शूट केला आहे.

दिवा शहरातील समाजसेवक आणि वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी अमोल केंद्रे यांना शिवसेना नगरसेवक शैलेश पाटील यांच्याकडून शिवीगाळ आणि मारण्याची धमकी माहिती केंद्रे यांनी दिली आहे. याबाबतची त्यांनी फेसबुक टाकली असून धमकी आणि शिविगाळ करताचा व्हिडिओ सुद्धा त्यांनी काढला आहे.

याबाबत ठाणे पोलीस स्थानकात अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला आहे. अमोल केंद्रे यांनी पोलिसांनी सुरक्षा द्यावी, अशी मागणी केली आहे. तर याबाबत शिवसेना नगरसेवक शैलेश पाटील प्रतिक्रिया दिलेली नाही.

First published: February 17, 2020, 8:15 PM IST
Tags: shivsena

ताज्या बातम्या