News18 Lokmat

वायू चक्रीवादळाचा धोका : मुंबईत जोरदार वाऱ्यामुळे होर्डिंग कोसळून एकाचा मृत्यू

'वायू' चक्रीवादळामुळे मुंबई आणि गुजरातच्या किनारपट्टीवर जोरदार वारे वाहत आहेत. या वाऱ्यामुळे मुंबईत चर्चगेट स्टेशनवरचं होर्डिंग कोसळलं. यात 62 वर्षांच्या मधुकर नार्वेकर यांचा मृत्यू ओढवला आहे.

News18 Lokmat | Updated On: Jun 12, 2019 04:20 PM IST

वायू चक्रीवादळाचा धोका : मुंबईत जोरदार वाऱ्यामुळे होर्डिंग कोसळून एकाचा मृत्यू

मुंबई, 12 जून : 'वायू' चक्रीवादळामुळे मुंबई आणि गुजरातच्या किनारपट्टीवर जोरदार वारे वाहत आहेत. या वाऱ्यामुळे मुंबईत चर्चगेट स्टेशनवरचं होर्डिंग कोसळलं. यात 62 वर्षांच्या मधुकर नार्वेकर यांचा मृत्यू ओढवला आहे.

मुंबईत जोरदार वारे आणि पावसामुळे वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. त्यातच मुंबईकरांच्या सुरक्षेचाही प्रश्न निर्माण झाला आहे. वादळ गुजरातच्या किनाऱ्याकडे सरकलं असलं तरी मुंबईत झाडं कोसळण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे मुंबईकरांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

मोदींकडून शिवसेनेला 15 दिवसांत दुसरा मोठा धक्का? दिल्लीत हालचालींना वेग

मुंबईत बुधवारी दुपारी सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. 'वायु' चक्रीवादळामुळे मुंबईच्या समुद्रात मोठ्या लाटाही उसळल्या आहेत. किनाऱ्यालगत असलेल्या कोळीवाड्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे कोळी बांधवांनी आपल्या बोटी समुद्राबाहेर काढल्या आहेत. माहीम कोळीवाड्याजवळ समुद्रात उभ्या असणाऱ्या तीन मासेमारी बोटी समुद्रात वाहून गेल्या.

पश्चिम रेल्वेला फटका

Loading...

वादळी वारे आणि पावसाचा फटका पश्चिम रेल्वेलाही बसला आहे. पालघरमध्ये एका रेल्वेवरून जाणाऱ्या पुलाचं गर्डर लावत असताना ते एक बाजूला वळलं. त्यामुळे पालघरहून येणाऱ्या गाड्या रद्द झाल्या. लांब पल्याच्या काही गाड्यांची वाहतूकही दुसरीकडे वळवण्यात आली आहे.

गुजरातला धोका

अरबी समुद्रात निर्माण झालेलं 'वायू' चक्रीवादळ आता गुजरातच्या दिशेने पुढे सरकलं आहे. हे वादळ 13 जूनला गुजरातच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे़. या वादळाचा फटका गुजरातमध्ये कच्छ, देवभूमी, द्वारका, पोरबंदर, राजकोट, जुनागड, दीव, गीर, सोमनाथ, अमरेली आणि भावनगर इथे बसू शकतो.

किनारपट्टीवर सतर्कतेचा इशारा

मुंबईसह कोकण किनारपट्टीवरही वायू चक्रीवादळामुळे सतर्केतेचा इशारा देण्यात आला आहे. या वादळामुळे अरबी समुद्रात उंचचउंच लाटा उसळत आहेत. त्यामुळे मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. पश्चिम किनारपट्टीवरच्या समुद्रकिनाऱ्यांवर जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे.

===============================================================================================================

VIDEO: वेगवान वाऱ्यानं भलमोठं झाडही उन्मळून पडलं

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 12, 2019 04:18 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...