VIDEO : हा 'मी' पणाच मुख्यमंत्र्यांना घेऊन बुडणार -संजय राऊत

VIDEO : हा 'मी' पणाच मुख्यमंत्र्यांना घेऊन बुडणार -संजय राऊत

भाजपामध्ये जो मी आहे त्या मी मुळेच त्यांची अशी अवस्था झाली आहे अशी टीका संजय राऊत यांनी केली.

  • Share this:

विजय देसाई,प्रतिनिधी

वसई,30 आॅक्टोबर : 'सामना नाही तर सरकार मी चालवतो' असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला टोला लगावला होता. त्यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी त्यांच्यातला मी पणाच त्यांना घेऊन बुडवणार असा पलटवार केला.

शिवसेनेचे खासदार संजय राऊत स्वर्गीय भास्कर ठाकूर यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी विरारमध्ये आले असता न्यूज 18 लोकमतच्या प्रतिनिधीशी बातचीत केली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या विधानावर प्रतिक्रिया दिली.

"मी म्हणजे कोण असा सवाल त्यांनी उपस्थित करून हा मीच त्यांना घेऊन बुडणार आहे. भाजपामध्ये जो मी आहे त्या मी मुळेच त्यांची अशी अवस्था झाली आहे अशी टीका संजय राऊत यांनी केली.

शिवसेनेनं पेंग्विन ऐवजी गाढवं आणली पाहिजे होती त्यांना सत्तेवर लाथ मारायला शिकवलं असतं अशी टीका राष्ट्रवादीचा नेते आफरीन शेख यांनी केली होती. त्यावर खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काय पक्ष आहे का असा सवाल उपस्थित करत खिल्ली उडवली.

रामराज्य होत तिथली अवस्था दयनीय असून विरारमधील अवस्था चांगली असल्याचे प्रमाणपत्रही राऊत यांनी आमदार हितेंद्र ठाकूर यांना दिले.

काय म्हणाले होते मुख्यमंत्री ?

२९ आॅक्टोबर रोजी  न्यूज18 नेटवर्कच्या 'रायझिंग महाराष्ट्र'  कार्यक्रम पार पडला. यावेळी मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी शिवसेनेला टोला लगावला होता. शिवसेना आपलं मुखपत्र सामनामध्ये काय भूमिका मांडतोय यावरून सामना सरकार चालवत नाही, मी सरकार चालवतोय असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी  शिवसेनेवर टीका केली होती. तसंच 2019 मध्ये मीच मुख्यमंत्री होणार आहे आणि शिवसेनेचाही पाठिंबाही मला मिळेल असा दावाही मुख्यमंत्र्यांनी केला होता.

=================

VIDEO:जलयुक्त शिवाराच्या नावाखाली सरकार पाठ थोपटवून घेतंय -धनंजय मुंडे

First published: October 30, 2018, 3:55 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading