खंडणीखोर डॉक्टरला पकडणाऱ्या पोलिसाला चक्क बदलीचं बक्षीस

खंडणीखोर डॉक्टरला पकडणाऱ्या पोलिसाला चक्क बदलीचं बक्षीस

एका खंडणीखोर डॉक्टरला पकडणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला चक्क बदलीचं बक्षीस मिळालंय.

  • Share this:

विजय देसाई, वसई

27 एप्रिल : गुन्हेगारांना पकडणाऱ्या पोलिसांना शक्यतो बक्षीस किंवा मेडल मिळतं. पण वसईतल्या एका पोलीस अधिकाऱ्याबाबत वेगळंच घडलंय. एका खंडणीखोर डॉक्टरला पकडणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला चक्क बदलीचं बक्षीस मिळालंय.

वसई पोलिसांच्या ताब्यात असलेला हा आहे खंडणीखोर डॉक्टर अनिल यादव....लाचखोरीमुळे निलंबित झालेल्या या डॉक्टरनं आरटीआयचा दुरुपयोग करीत परिसरात खंडणीखोरीचा धंदा सुरू केला होता. एका बांधकाम व्यावसायिकाकडे 25 लाखांची खंडणी मागितल्या प्रकरणात त्याच्यावर गुन्हा दाखल होता. एपीआय प्रशांत लांघी यांनी फरार झालेल्या यादवला युपीतल्या गाझियाबादमधून पकडलं. तर त्याच्या इतर साथिदारांच्याही पोलिसांनी मुसक्या आवळल्या.

धडाकेबाज कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्याला बक्षीस मिळणं अपेक्षित असताना प्रशांत लांघी यांची तडकाफडकी बदली करण्यात आली. आरोपीने आणलेल्या दबावातूनच पोलीस अधिकाऱ्याची बदली झाल्याचा आरोप फिर्यादीच्या वकिलांनी केलाय.

गुन्हेगारांना पकडणाऱ्या पोलिसांना प्रोत्साहन देणं अपेक्षित असताना त्यांची तडकाफडकी बदली करण्यात आली. गुन्हेगारांवर वचक बसवणाऱ्या अधिकाऱ्यांना चांगल्या कामाचं बक्षीस बदली किंवा शिक्षा असं मिळत असेल तर त्याचा निश्चित पोलिसांच्या मनोबलावर परिणाम होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 27, 2017 11:21 PM IST

ताज्या बातम्या