Home /News /mumbai /

खळबळजनक! वसई-विरार महापालिका सहाय्यक आयुक्त प्रेमसिंग जाधव बेपत्ता; तपासाला वेग

खळबळजनक! वसई-विरार महापालिका सहाय्यक आयुक्त प्रेमसिंग जाधव बेपत्ता; तपासाला वेग

वसई विरार महापालिकेचे (Vasai Virar Municipal Corporation) सहाय्यक आयुक्त (Assistant Commissioner) प्रेमसिंग जाधव मागील दोन दिवसांपासून बेपत्ता (Premsingh Jadhav missing) असल्याची माहिती समोर आली आहे.

    वसई-विरार, 04 जून: वसई-विरारमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, ज्यामुळे महापालिकेत एकच खळबळ उडाली आहे. वसई विरार महापालिकेचे (Vasai Virar Municipal Corporation) सहाय्यक आयुक्त (Assistant Commissioner) प्रेमसिंग जाधव मागील दोन दिवसांपासून बेपत्ता (Premsingh Jadhav missing) असल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी विरार पोलीस ठाण्यात सहाय्यक आयुक्त बेपत्ता झाल्याची तक्रार देण्यात आली आहे. तक्रारीनंतर पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवण्यास सुरुवात केली आहे. अद्याप त्याच्या बेपत्ता होण्यामागचं कोणतंही कारण समोर आलं नाही. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. या घटनेनं संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली आहे. खरंतर, देशात कोरोना विषाणूचा शिरकाव झाल्यापासून जाधव यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली होती. गेल्या दीड वर्षांपासून जाधव महापालिकेत कोरोना रुग्णांच्या मृतदेहांची विल्हेवाट लावण्याचं काम करत होते. कोरोना लढ्यातील ही महत्त्वपूर्ण जबाबदारी जाधव यांच्याकडे देण्यात आली होती. पण मागील दोन दिवसांपासून ते बेपत्ता असल्याची माहिती समोर आल्याने शहरात खळबळ उडाली आहे. एवढ्या मोठ्या पदावरील व्यक्ती अचानक बेपत्ता झाल्याने शहरात उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे. आपल्या पदावर रुजु झाल्यापासून प्रेमसिंग जाधव यांनी शहरात अनेक महत्त्वाची कामं केली आहेत. सहाय्यक आयुक्त पदावर कार्यरत असताना, त्यांनी शहरातील अनेक अनाधिकृत बांधकामांवर कारवाईचा बडगा उगरला आहे. त्यामुळे त्यांच्यावर अनेकांचा राग असल्याची चर्चाही दबक्या आवाजात सुरू आहे. महाराष्ट्र टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, 2 जून रोजी सहाय्यक जाधव आपलं कार्यालयातील कामकाज उरकून घरी जाण्यासाठी निघाले होते. पण ते घरी पोहोचलेच नसल्याचं कुटुंबीयांकडून सांगण्यात येत आहे. हे ही वाचा-'...अन्यथा तुला जिवंत सोडणार नाही'; स्पीड पोस्टद्वारे 20 लाखाच्या खंडणीची मागणी याप्रकरणी कुटुंबीयांनी विरार पोलीस ठाण्यात सहाय्यक आयुक्त प्रेमसिंग जाधब बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी या तक्रारीची गांभीर्याने दखल घेतली असून तपासाला वेग दिला आहे. पण एवढ्या मोठ्या पदावरील व्यक्ती अचानक बेपत्ता झाल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Crime news, Kidnapping, Mumbai, Vasai virar

    पुढील बातम्या