विजय देसाई, वसई, 22 जानेवारी : वसई पश्चिमेकडील देव तलाव येथे एक विचित्र अपघात घडला आहे. टेम्पोच्या धडकेत दुचाकी स्वार थोडक्यात बचावला आहे. वसईच्या देव तलाव येथील स्वागत सर्व्हीस सेंटर जंक्शन येथे 20 जानेवारीला दुपारी 12:15 वाजता हा अपघात झाला.
अपघात झाला तेव्हा दुचाकी स्वार आणि टेम्पोचालक दोघेही भरधाव वेगात होते. टेम्पोच्या धडकेने दुचाकी स्वार काही अंतरावर दूर फेकला गेला. मात्र सुदैवाने या अपघातात दुचाकीस्वार हा बचावला आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
दरम्यान, दुचाकीस्वार हा गण नाक्यावरुन उत्तन येथे जात होता. तर त्याचवेळी टेम्पोचालक मडीपासून देव तलाव येथे जात होता. अचानक आलेल्या मोटार सायकलस्वार थोडक्यात बचावला असून काळ आला होता पण वेळ आली नव्हती, असंच घडल्याचं बोललं जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.