'तुमचा पती घरी आहे का' असं विचारत घरात घुसले गुन्हेगार, क्लास चालवणाऱ्या महिलेचा विनयभंग

'तुमचा पती घरी आहे का' असं विचारत घरात घुसले गुन्हेगार, क्लास चालवणाऱ्या महिलेचा विनयभंग

याप्रकरणी माणिकपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • Share this:

वसई, 3 मार्च : वसई येथे क्लास चालवणाऱ्या महिलेचा विनयभंग करण्यात आल्याची घटना घडील आहे. वसई येथे एका क्लासेस चालवणाऱ्या महिलेचा दोन अनोळखी इसमांनी घरी येऊन विनयभंग केला असून याप्रकरणी माणिकपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वसई पश्चिमेकडील गुरूनानक नगर येथे राहणाऱ्या पीडित महिला (वय 25) यांच्या क्लासेसमध्ये दोन अनोळखी इसम आले. आधी त्यांनी महिलेला विचारले की तुमचे पती घरी आहेत का? त्यावर महिलेनं नाही असं उत्तर देताच आम्हाला तुमच्याशी बोलायचं आहे, असं या इसमांनी सांगितलं. मात्र त्यावर पीडित महिला त्यांना बोलली की, 'आज रविवार आहे. क्लासेसला सुट्टी आहे.'

महिलेनं क्लासेसला सुट्टी आहे असं सांगताच त्यातील एका इसमाने त्यांना धक्का देऊन खाली पाडले आणि महिलेचा विनयभंग केला. त्यानंतर लगेच दुसऱ्या इसमाने विनयभंग करतानाच मोबाईलमध्ये फोटो काढला. महिलेने आरडाओरडा करताच ते दोन्ही इसम तिथून पळून गेले.

हेही वाचा- पत्नी आणि मेहुण्याला अडकित्त्याने वार करत संपवलं, रागातून उद्धवस्त झाली दोन कुटुंब

याप्रकरणी पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीवरून माणिकपूर पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपासपोलीस करत आहेत. मात्र घरात घुसून नराधमांनी केलेल्या या कृत्यामुळे आजुबाजूच्या महिलांमध्येही दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

First published: March 3, 2020, 4:59 PM IST

ताज्या बातम्या