• Home
  • »
  • News
  • »
  • mumbai
  • »
  • एसटी सेवा सुरू करा नाहीतर पालिका बरखास्त करू ; हायकोर्टाचा वसई-विरार पालिकेला इशारा

एसटी सेवा सुरू करा नाहीतर पालिका बरखास्त करू ; हायकोर्टाचा वसई-विरार पालिकेला इशारा

वसई-विरार भागातील एसटी सेवा सुरू करा अन्यथा पालिका बरखास्त करुन आम्ही प्रशासक बसवू असा सज्जड दम मुंबई उच्च न्यायालयाने वसई विरार महापालिकेला दिलाय.

  • Share this:
31 मार्च : वसई-विरार भागातील एसटी सेवा सुरू करा अन्यथा पालिका बरखास्त करुन आम्ही प्रशासक बसवू असा सज्जड दम मुंबई उच्च न्यायालयाने वसई विरार महापालिकेला दिलाय. सेवा तोट्यात असल्यामुळे एसटी महामंडळानं ३१ मार्चपासून वसई विरार येथील काही फेऱ्या बंद करणार असल्याचं जाहीर केलं होतं. महामंडळाच्या या निर्णयाविरोधात वसईतील १२ वर्षीय शाळकरी मुलानं त्याच्या शिक्षकांसोबत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावर सुनावणी दरम्यान हायकोर्टाने पालिकेला चांगलंच फैलावर घेतलं. एसटी सेवा सुरू करा अन्यथा पालिका बरखास्त करुन आम्ही प्रशासक बसवू असा सज्जड दम हायकोर्टाने पालिकेला भरला. एवढंच नाहीतर जर वसई विरार महापालिकेकडून हा मुद्दा सुटत नसेल तर राज्य सरकारने यात जातीनं लक्ष घालून लवकरात लवकर वसई विरार भागात एसटी सेवा सुरू करावी, असे आदेशही मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. तर दुसरीकडे हायकोर्टाने एसटी महामंडळाला देखील खडसावलं असून तुम्हाला जर महामंडळ चालवता येत नसेल तर तसं सांगा, आम्ही तिथं संचालक नेमतो मात्र परिक्षेच्या काळात विद्यार्थ्यांचे आणखी हाल करू नका, असे खडेबोल न्यायालयाने एसटी महामंडळाला सुनावले आहेत.  या याचिकेवर १५ दिवसांनी पुन्हा सुनावणी आहे.
First published: