पोलिसच बनला चोर.. जप्त केलेल्या महागड्या विदेशी सिगारेट्सवर मारला डल्ला

पोलिसच बनला चोर.. जप्त केलेल्या महागड्या विदेशी सिगारेट्सवर मारला डल्ला

वसईत पोलिसांनी जप्त केला कोट्यवधींचा माल एका पोलीस कॉन्स्टेबलने परस्पर विकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

  • Share this:

विजय देसाई, (प्रतिनिधी)

वसई, 14 सप्टेंबर: वसईत पोलिसांनी जप्त केला कोट्यवधींचा माल एका पोलीस कॉन्स्टेबलने परस्पर विकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी वालिव पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल  करण्यात आला आहे. ड्युटीवरील एका पोलिस कॉन्स्टेबलला पोलिस स्टेशनमध्ये चोरी केल्याच्या आरोपाखाली त्याला अटक करण्यात आली आहे.

काय आहे प्रकरण?

2 कोटी 16 लाख रूपये किमतीच्या विदेशी सिगारेटच्या जप्त केलेल्या मालाची चोरी करून त्याने त्याची विक्री केली होती. वालिव पोलिसांनी 31 डिसेंबर 2018 रोजी विदेशी कंपनीचा सिगारेटचा माल तस्करी करणाऱ्यांकडून कारवाई करत जप्त केला होता. एका टेम्पोतील 150 गोण्यांमध्ये हा माल भरण्यात आला होता. पोलिसांनी पंचनामा करून टेम्पोसहित जप्त केलेला माल वालिव पोलिस स्टेशनमध्ये आणला. जप्त केलेल्या मालावर निगराणी ठेवणारा मुदैमाल कारकून तसेच सहाय्यक फौजदार शरीफ रमझान शेख (वय 48) याने काही लोकांना सोबत घेत त्यातील 100 गोण्या परस्पर लंपास केल्या. या विदेशी सिगारेटची तस्करी ज्या टेम्पोमधून झाली होती. त्या टेम्पोचालकाने आपले वाहन परत मिळविण्यासाठी दावा केला होता. त्यानुसार 11 सप्टेंबर रोजी कोर्टाने पोलिसांना टेम्पोमधील 150 गोण्यांतील माल पोलिस ठाण्यात हलवून टेम्पो मालकाला टेम्पो परत देण्याचा आदेश दिला होता. पोलिसांनी जप्त केलेला माल मोजला असता पंचनाम्याच्या वेळी असलेल्या 150 गोण्यांपैकी फक्त 50 गोणीच वाहनात असल्याचे दिसून आले. जप्त केलेला विदेशी सिगारेटचा साठा गायब झाल्यामुळे चौकशी केली असता सदर पोलिस कर्मचारी दोषी असल्याचे निष्पन्न झाले आहे. याबाबत सदर पोलिस कर्मचाऱ्यावर कलम 409 अन्वये गुन्हा दाखल करत त्याला निलंबित करत अटक करण्यात आली आहे. त्याला न्यायालयाने 16 तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. यात अजून काही कर्मचारी असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

SPECIAL REPORT: माजी पोलीस अधिकारी प्रदीश शर्मांच्या हाती बंदुकीऐवजी आता धनुष्यबाण

Published by: Sandip Parolekar
First published: September 14, 2019, 9:06 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading