मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /जंगलात आग लागण्याचं सत्र सुरूच, सातीवली खिंडीतील अग्नितांडवाचा भीषण VIDEO

जंगलात आग लागण्याचं सत्र सुरूच, सातीवली खिंडीतील अग्नितांडवाचा भीषण VIDEO

Vasai Fire: वसईतील भागात जंगलाला आग लागण्याचे सत्र अद्यापही सुरूच आहे. तुंगारेश्वर पाठोपाठ आता सातीवली खिंडीतील जंगलाला शुक्रवारी रात्रीच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली आहे.

वसई, 13 मार्च: वसईतील भागात जंगलाला आग लागण्याचे सत्र अद्यापही सुरूच आहे. तुंगारेश्वर पाठोपाठ आता सातीवली खिंडीतील जंगलाला शुक्रवारी रात्रीच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली आहे.

वसई पूर्वेतील परिसर हा डोंगर भाग असल्याने मोठ्या प्रमाणात जंगलपट्टा आहे. मागील तीन ते चार दिवसांपासून येथील विविध ठिकाणच्या भागात जंगलांना आगी लागण्याचे प्रकार घडत आहेत. शुक्रवारी पुन्हा एकदा सातीवली खिंडीत जंगलाला आग लागली होती. या लागलेल्या आगीची माहिती तातडीने येथील नागरिकांनी महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांना दिली. माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल होऊन आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम करीत आहेत. आगीची भीषणता अधिक असल्याने या आगीत मोठ्या प्रमाणात जंगलपट्टा जळून खाक झाला आहे. त्यामुळे या भागात निसर्गाची मोठी हानी झाली आहे.

वसई पूर्वेकडील हा भाग मोठ्या जंगलपट्ट्यासाठी प्रसिद्ध आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून या भागात आगीचे सत्र वाढले आहे. तुंगारेश्वर अभयारण्य आणि मांडवी वनविभाग अशा दोन भागात हा जंगलपट्टा वाटला गेला आहे. दोन्ही भागात गेल्या काही दिवसांपासून आग लागण्याचं प्रमाण वाढलं आहे.

(हे वाचा-लाज आणणारी घटना, वृद्ध मृत्यूशी झुंज देत होता आणि पोलीस तमाशा बघत होते!)

मंगळवारी तुंगारेश्वर अभयारण्यात नागले ते पाये दरम्यानच्या डोंगराला आग लागली होती. त्यानंतर अवघ्या काही दिवसातच ही दुसरी भीषण आग लागली आहे. सातीवली खिंडीतील जंगलात आग लागल्याने पुन्हा जंगलपट्ट्याचं नुकसान झालं आहे. दरम्यान वसई विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाकडून आगीवर रात्री उशिरापर्यंत नियंत्रण आणण्याचे प्रयत्न सुरू होते. जंगलात सध्या सुकलेले गवत असल्यामुळे आग वेगाने पसरली.

First published:
top videos

    Tags: Fire, Mumbai, Vasai