S M L

ट्रॅफिकमध्ये सेल्फी काढला म्हणून वरुण धवनला पोलिसांनी केला दंड

अभिनेता वरुण धवनला मुंबई पोलिसांनी चांगलीच समज दिलीये. वरुणनं भर रस्त्यात गाडीत बसून एका चाहतीबरोबर सेल्फी काढला. वरुणनं ट्विटरवरून याबाबत माफीही मागितली आहे.

Sonali Deshpande | Updated On: Nov 23, 2017 01:35 PM IST

ट्रॅफिकमध्ये सेल्फी काढला म्हणून वरुण धवनला पोलिसांनी केला दंड

23 नोव्हेंबर : अभिनेता वरुण धवनला मुंबई पोलिसांनी चांगलीच समज दिलीये. वरुणनं भर रस्त्यात गाडीत बसून एका चाहतीबरोबर सेल्फी काढला. वरुणनं ट्विटरवरून याबाबत माफीही मागितली आहे.

आता कुणी म्हणेल, यात काय एवढं. पण वरुणची गाडी रस्त्याच्या मधोमध थांबली होती. त्याची गाडी किंवा ती रिक्षा जर सुरू झाली असती, तर दुखापत होऊ शकली असती. मुंबई पोलिसांनी यासाठी वरुण धवनला दंड ठोठावलाय, आणि ई-चलान त्याच्या घरी पाठवलं. तसंच, ट्विट करूनही वरुणला चार खडे बोल सुनावलेत. तरुणांचा आदर्श या नात्यानं तुमच्याकडून अधिक अपेक्षा आहेत, पुढच्या वेळी अधिक कठोर कारवाई करू, असं ट्विट पोलिसांनी केलंय.

पाहूयात मुंबई पोलिसांनी काय ट्विट केलं ते..


- वरुण धवन, हे साहस चंदेरी स्क्रीनवर छान दिसतं. पण खऱ्या आयुष्यात असं करू नये, खास करून मुंबईच्या रस्त्यावर तर नाहीच ! तुम्ही तुमचं, तुमच्या चाहतीचं आणि इतर काहींचं आयुष्य धोक्यात घातलंत. एका जबाबदार मुंबईकर आणि तरुणांचे आदर्श या नात्यानं तुमच्याकडून जास्त अपेक्षा आहेत. तुमच्या घरी ई-चलान पाठवलंय, पुढच्या वेळी अधिक कडक कारवाई केली जाईल.

याबाबत माफी मागताना वरुणनं काय ट्विट केलंय बघा..

- मी माफी मागतो. ट्रॅफिक सिग्नलला असल्यामुळे आमची वाहनं एकाच ठिकाणी उभी होती. मला एका फॅनच्या भावना दुखवायच्या नव्हत्या. पण पुढच्या वेळेपासून मी सुरक्षेचा मुद्दा ध्यानात ठेवीन आणि असल्या प्रकाराला प्रोत्साहन देणार नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 23, 2017 01:35 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close