मुख्यमंत्र्यांनी भेट दिल्यानंतर वर्सोवा बीचची स्वच्छता पुन्हा सुरू

मुख्यमंत्र्यांनी भेट दिल्यानंतर वर्सोवा बीचची स्वच्छता पुन्हा सुरू

मुंबईच्या वर्सोवा बीचवर अफरोज शेखने स्वच्छता मोहिम सुरू केली होती. या मोहिमेला चांगला प्रतिसाद तर मिळतच होता पण त्याचसोबत मन की बातमध्ये पंतप्रधान मोदींनी त्यांची तारीफही केली होती. पण त्यानंतर या मोहिमेला स्थानिक गुंडांकडून त्रास होत होता

  • Share this:

03 डिसेंबर: वर्सोवा बीचच्या स्वच्छतेचा ध्यास घेतलेल्या अफरोज शहानं आपली मोहिम थांबवली होती.  स्थानिक गुंडांकडून त्रास होतोय असं अफरोजनं सोशल मिडीयावर पोस्ट केलं होतं. ही मोहीम आता पुन्हा सुरू झाली आहे.

मुंबईच्या वर्सोवा बीचवर अफरोज शेखने स्वच्छता मोहिम सुरू केली होती. या मोहिमेला चांगला प्रतिसाद तर मिळतच होता पण त्याचसोबत  मन की बातमध्ये पंतप्रधान मोदींनी त्यांची तारीफही केली होती. पण त्यानंतर या मोहिमेला स्थानिक गुंडांकडून त्रास होत होता. ही बातमी सोशल मीडियावर पसरली होती.   या प्रकारावर विविध स्तरांतून टीकाही करण्यात येत होती.

आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंनी वर्सोवा बीचला भेट दिली. अफरोजचा आत्मविश्वास वाढवायला आम्ही इथे आल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. तर यापुढे अफरोजला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही अशी ग्वाही आदित्य ठाकरे यांनी दिली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 3, 2017 05:45 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading