मुंबई, 07 डिसेंबर : नव्या युगात जुन्या वस्तू लुप्त होतं चालल्या आहेत. त्यामुळे त्या वस्तू आपल्याला नेहमीच आकर्षित करतात. अँटिक आणि युनिक वस्तू दिसल्या की खरेदीचा मोह बिलकुल आवरला जात नाही. कधी कधी आपण अश्या वस्तूंच्या शोधात सुद्धा असतो. त्यातलाच एक प्रकार म्हणजे वेतापासून बनवलेल्या वस्तू आपण शोधत असतो. याच वस्तू मुंबईत कुठे मिळतात ते पाहूया.
वेतापासून कोणत्या वस्तू बनवल्या जातात?
वेतापासून विविध आकाराचे कंदील, स्टुल, खुर्च्या, सोफा, टोपल्या, इत्यांदी वस्तू बनवण्यात येतात. फुलं, पान, फळं, इत्यांदीच्या आकारात सुद्धा या वस्तू बनवून मिळतात. ग्राहकांना हव्या त्या डिझाईनमध्ये मुंबईतील वांद्रे येथील कारागीर शोभेच्या वस्तू बनवतात.
Christmas 2022 : फक्त 50 रुपयांपासून करा ख्रिसमची भन्नाट शॉपिंग, Video
कश्या बनवल्या जातात वेतापासून शोभेच्या वस्तू?
वेत हा एक लाकडाचा प्रकार आहे. वेताच्या बारीक काड्या सोलल्या जातात त्यानंतर त्याला पाण्यात भिजवून ठेवलं जातं. पाण्यात भिजवल्यामुळे वेत मऊ होतं आणि विनायला सोपं जातं. त्यानंतर कारागीर वस्तू बनवतात. एक कंदील बनवायला साधारणतः 2 तास लागतात तर टोपली, स्टूल, खुर्ची बनवायला 3-4 तास लागतात. सोफा, पाळणा बनवण्यासाठी 4-5 दिवस लागतात.
कुठे वापरल्या जातात या वस्तू?
खरं तर सध्या दररोजच्या वापरात धातूची भांडी आणि इतर गोष्टी आल्यामुळे अश्या गोष्टी कमी वापरण्यात येतात. पण गार्डन, फार्महाऊस किंवा एखादं स्पेशल थीम ठेऊन बनवलेल्या घराच्या इंटेरिअरमध्ये या वस्तू वापरल्या जातात. सण उत्सवाच्या वेळी अगदी रोषणाई साठी लहान लहान लॅम्पची ऑर्डर ग्राहक करतात. नाताळसाठी सुद्धा लाइटिंग करायला ग्राहक या दुकानाना भेट देत आहेत.
लग्नात मिरवायला मोत्यांचे दागिने हवेच! पाहा कोणते प्रकार आहेत बाजारात उपलब्ध, Video
किती रुपयांना मिळतात वेताच्या वस्तू?
वेताने हातकाम केलेला हा एक फर्निचरचाच प्रकार आहे. प्रत्येकाची किंमत ही वेगवेगळी आहे. लॅम्प त्याच्या आकाराप्रमाणे 200 रुपये ते 2 हजार रुपयांपर्यंत मिळतात. इतर गोष्टी 500 रुपयापासून 10 हजार रुपयांपर्यंत मिळतात, अशी माहिती एथनिक आर्ट दुकानातील कर्मचारी हुसेन झर्दी यांनी दिली.
कुठे आहेत ही दुकानं?
वांद्रे स्थानकाच्या पश्चिम दिशेलाच 10 मिनिटांच्या अंतरावर अगदी लहान लहान दुकानं एका रांगेत आहेत. तेथेच वेतापासून बनवलेले फर्निचर मिळते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.