मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये वंदे मातरम् सक्तीचं !

मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये वंदे मातरम् सक्तीचं !

आठवड्यातून दोन वेळा शाळांमध्ये वंदे मातरम् बोलण्याची सक्ती असणार आहे. मुंबई महापालिकेच्या महासभेत बहुमतानं हा ठराव मंजूर करण्यात आला.

  • Share this:

प्रणाली कापसे, मुंबई

 

10 आॅगस्ट : मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये आता वंदे मातरम् ची सक्ती करण्यात आलीये. आठवड्यातून दोन वेळा शाळांमध्ये वंदे मातरम् बोलण्याची सक्ती असणार आहे. मुंबई महापालिकेच्या महासभेत बहुमतानं हा ठराव मंजूर करण्यात आला.

मुंबई महापालिकेच्या सभागृहात ही वंदे मातरम् म्हणण्यावरुन गदारोळ माजलाय. महापालकेच्या शाळांमधून वंदे मातरम् म्हणणे बंधनकारक करण्याचा मुद्दा पुढे आले आहे. या मुद्यावरुन समाजवादी पक्षानं सभात्याग केला तर काँग्रेसनेही बंधनकारक करण्याला विरोध केला आहे.

मुंबई महापालिकेतील मुस्लीम नगरसेवकांनी आज मुंबईच्या महापौरांचा धिक्कार करत. वंदे मातरम् म्हणणे बंधनकारक करण्याला विरोध केलाय. या मुद्यावर मतदान मागणी तयारी विरोधकांनी केली होती. पण महापौरांनी बोलण्याची संधी न देताच ठरावाची सुचना मंजूर केल्यानं मुस्लीम नगरसेवकांनी सभात्याग केला.

तर ही ठरावाची सुचना मांडणारे भाजपचे नगरसेवक संदीप पटेल यांनी आनंद व्यक्त केला आहे की, त्यांच्या ठरावाच्या सुचनेला मंजुरी मिळाल्यामुळे महापालिकेच्या शाळांमधून दोन दिवस आणि पालिकेतील सर्व वैधानिक समित्यांच्या सुरुवातीला वंदे मातरम् गायलं जाणार आहे.

यापूर्वी ही २००४ मध्ये अशी ठरावाची सुचना मांडण्यात आली होती. तत्कालिन आयुक्तांनी वंदे मातरम् सक्तीचे करता येणार नाही असा अभिप्राय दिला होता. त्यामुळे ही सुचना मोडीत निघाली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 10, 2017 10:33 PM IST

ताज्या बातम्या