प्रकाश आंबेडकरांच्या 'या' निर्णयामुळे 'काँग्रेस-राष्ट्रवादी'ची चिंता वाढणार

प्रकाश आंबेडकरांच्या या निर्णयामुळे वंचितचा जो मतदार आहे तो काँग्रेस-राष्ट्रवादीचा पारंपरिक मतदार आहे. त्यामुळे त्यात खिंडार पडण्याची शक्यता आहे.

News18 Lokmat | Updated On: Sep 30, 2019 04:45 PM IST

प्रकाश आंबेडकरांच्या 'या' निर्णयामुळे 'काँग्रेस-राष्ट्रवादी'ची चिंता वाढणार

स्वाती लोखंडे-ढोके, मुंबई 30 सप्टेंबर : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आज आपला निर्णय जाहीर केलाय. 'वंचित' महाराष्ट्रातल्या सर्व 288 जागा लढविणार आहे. 'वंचित'ची 120 उमेदवारांची यादी आज जाहीर होणार असून लवकरच इतर सर्व उमेदवारांची नावं जाहीर करू असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय. मुंबईत पत्रकार परिषद घेऊन त्यांनी ही घोषणा केली. आंबेडकरांच्या या घोषणेमुळे काँग्रेस-राष्ट्रवादीला फटका बसण्याची शक्यता आहे. लोकसभेत MIM वंचित सोबत होतं. मात्र विधानसभेच्या निवडणुकीत MIMही स्वतंत्रपणे निवडणूक लढविणार असल्याने मुस्लिम आणि बहुजन मतांची मोठ्या प्रमाणावर विभागणी होण्याची शक्यता व्यक्त केली जातेय.

पंढरपुरात शरद पवारांचा भाजपला दे धक्का, भालके 'भाजप'ऐवजी 'राष्ट्रवादी'त जाणार

प्रकाश आंबेडकर म्हणाले, वंचित बहुजन आघाडी 288 जागांवर निवडणूक लढवणार आहे.  मंगळवारी संध्याकाळपर्यंत सगळ्याच म्हणजे 288 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येईल. अर्धा CPM, महाराष्ट्र विकास आघाडी, असे लोक आमच्या सोबत आहेत 120 उमेदवारांची यादी जाहीर आजच जाहीर होईल. निवडणुकीसाठी गोपीचंद पडळकर ते भाजपमध्ये गेले आहेत. आणि निवडणुकीनातर ते आमच्याकडे परत येतील असंही आंबेडकर यांनी सांगितले. त्यांच्या वाटचालीस शुभेच्छा आहेत असंही त्यांनी सांगितलं.

राष्ट्रवादीत किरायादार घराचे 'मालक' झाले, मुंदडांचा धनंजय मुंडेंवर घणाघात

लोकसभेच्या निवडणुकीत वंचित मुळे काँग्रेस-राष्ट्रवादीला फटका बसला होता. आघाडीला 10 ते 12 जागांचा फटका बसल्याचा अंदाजही व्यक्त करण्यात आला होता. त्यामुळे विधानसभेत काय निकाल लागतील याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. वंचितचा जो मतदार आहे तो काँग्रेस-राष्ट्रवादीचा पारंपरिक मतदार आहे. त्यामुळे त्यात खिंडार पडण्याची शक्यता आहे. आमचा मुख्य राजकीय प्रतिस्पर्धी हा भाजप-शिवसेना असल्याचं प्रकाश आंबेडकरांनी म्हटलंय. तर वचिंत हाच आमचा मुख्य विरोधक आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. त्यामुळे राजकीय सामना चांगलाच रंगण्याची शक्यता आहे.

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 30, 2019 04:45 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...