मुंबई, 18 डिसेंबर: पालघर जिल्ह्यातील अतिदुर्गम आणि डोंगराळ भागात वाहतुक पूरक सुविधा नसल्याने कोरोना लसीचे (Corona Vaccine) डोस पोहचविण्यासाठी अनेक अडचणी येत होत्या. यावर उपाय म्हणून जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात लस पोहोचवण्यासाठी ड्रोनची मदत घेण्यात आहे. कोरोना प्रतिबंधात्मक लस ड्रोनच्या मदतीने अतिदुर्गम (Vaccine Delivered From Drone) भागातील गावांपर्यंत पोहोचवण्याची मोहिम फत्ते झाली आहे.
महाराष्ट्रतील (Maharashtra) पालघर जिल्ह्यामधील (Palghar) जाट या गावामध्ये राज्या आरोग्य विभागाकडून ड्रोनच्या मदतीने लसपुरवठा करण्यात आला आहे.
राज्याच्या आरोग्य विभागाने महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील जत गावातही लस पोहोचवली आहे. या मोहिमेची सुरुवात अतिरिक्त मुख्य सचिव (आरोग्य) डॉ प्रदीप व्यास यांच्या हस्ते करण्यात आली. जाट गावात पोहोचायला साधारणत: एक तास लागत होता, पण ड्रोनने ते फक्त 9.5 मिनिटांत लस गावकऱ्यांकडे पोहचली आहे.
राज्याच्या आरोग्य विभागाच्या उपसंचालक (कोकण) डॉ. गौरी राठोड यांनी सांगितले की, “पालघरची भौगोलिक स्थिती किंवा रस्ते यामुळे लस पोहोचवणे खूप कठीण आहे. ड्रोनच्या मदतीने ते 10 मिनिटांत पोहोचले आहेत. पूर्वी त्यांना पोहोचवायला एक तास लागायचा.
डॉ. प्रदीप व्यास म्हणाले, “सध्या हा प्रोजेक्ट पायलट प्रोजेक्ट म्हणून हाती घेण्यात आला आहे. आम्ही सध्या त्याची किंमत पाहत आहोत जेणेकरुन भविष्यात ती कोणत्या क्षेत्रात वाढवता येईल याची चाचणी घेता येईल. हे ड्रोन 15 ते 20 किमी पर्यंत जाऊ शकतात आणि 5 किलो किंवा त्याहून अधिक वजनाचा माल वाहून नेऊ शकतात.
हा ड्रोन मुंबईत राहणारा धवल घेलाशा या तरुणाने उडवला आहे. तो म्हणतो, 'आमचे बेस स्टेशन जव्हारमध्ये आहे. या प्रकल्पाचे पायलट उड्डाण जत गावापर्यंत होते. सहसा यास 1 तास लागला. मात्र ड्रोनच्या माध्यमातून अवघ्या 9.5 मिनिटांत लसीचे ३०० डोस जत गावात पोहोचवण्यात आले.
ड्रोनद्वारे कोरोनाची लस देण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी तेलंगणा आणि उत्तराखंडमधील गावांमध्ये लस पोहोचवण्यासाठी ड्रोनचाही वापर करण्यात आला आहे. तेलंगणात सप्टेंबरमध्ये हैदराबादपासून ७५ किमी दूर असलेल्या विकाराबादमध्ये ड्रोनद्वारे औषधे पोहोचवली गेली आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona vaccination, Corona vaccine, Palghar