मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /मोठी बातमी: मुंबईत कोरोना लसीकरणाला स्थगिती

मोठी बातमी: मुंबईत कोरोना लसीकरणाला स्थगिती

आजपासून देशभरात कोरोना लसीकरणाचं अभियान सुरू झालं आहे. मात्र दरम्यान मुंबईतून एक बातमी समोर आली आहे.

आजपासून देशभरात कोरोना लसीकरणाचं अभियान सुरू झालं आहे. मात्र दरम्यान मुंबईतून एक बातमी समोर आली आहे.

आजपासून देशभरात कोरोना लसीकरणाचं अभियान सुरू झालं आहे. मात्र दरम्यान मुंबईतून एक बातमी समोर आली आहे.

मुंबई, 16 डिसेंबर : कोरोना लसीकरणाबाबत (Corona vaccination) मुंबईत मोठी घडामोड समोर आली आहे. कोविन ॲपची तांत्रिक समस्या दूर करण्याचे काम सुरू असल्याने दिनांक 17 आणि 18 जानेवारी असे दोन दिवस लसीकरण स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

कोविड 19 लसीकरण मोहिमेची आज (दिनांक 16जानेवारी 2021) अंमलबजावणी करत असताना, या मोहिमेसाठी कार्यरत असलेल्या कोवीन ॲपमध्ये तांत्रिक समस्या उद्भवत असल्याचे निदर्शनास आले. ही समस्या दूर करण्याचे प्रयत्न केंद्र शासनाकडून सुरू आहेत. कोविड लसीकरण करत असताना संपूर्णपणे डिजिटल नोंदणी करणे सक्तीचे आहे.

आज तांत्रिक अडचण आली असता ऑफलाईन नोंदी करण्यास परवानगी शासनाने दिली होती. तथापि यापुढील सर्व नोंदी ॲप द्वारेच करण्याचे शासनाचे निर्देश आहेत. ही बाब लक्षात घेता, मुंबईत रविवार दिनांक 17 जानेवारी आणि सोमवार दिनांक 18 जानेवारी असे दोन दिवस कोविड 19 लसीकरण स्थगित ठेवण्यात आले आहे. कोविन ॲप पूर्ववत होताच लसीकरण पुन्हा सुरू होणार आहे. याबाबत मुंबई महानगरपालिकेने प्रसिद्धीपत्रक जारी करत माहिती दिली आहे.

दरम्यान, राज्यात आज बहुतांश जिल्ह्यांमध्ये संबंधित जिल्ह्यांचे पालकमंत्री, स्थानिक लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, महापालिका आयुक्त यांच्या उपस्थितीत लसीकरणाचा शुभारंभ झाला. आज सायंकाळी  सात वाजेपर्यंत  लसीकरण सुरू होते. सुमारे 18 हजार 338 हून  अधिक (सुमारे 64 टक्के) कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली. काही ठिकाणी सायंकाळी सातनंतरही लसीकरण सुरू होते. लसीकरणास कर्मचाऱ्यांकडून अपेक्षित असा प्रतिसाद मिळाला असून दिवसभरात कुठेही लसीमुळे गंभीर दुष्परिणाम झाल्याची नोंद नसल्याचे आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले.

First published:

Tags: Corona vaccine, Mumbai