Home /News /mumbai /

18 वर्षांपुढील लसीकरणाला तुर्तास ब्रेक, वृद्धांना पहिले प्राधान्य, राजेश टोपेंची घोषणा

18 वर्षांपुढील लसीकरणाला तुर्तास ब्रेक, वृद्धांना पहिले प्राधान्य, राजेश टोपेंची घोषणा

'सर्व शाळा आणि सेंटरची यादी तयार करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना दोन दिवसांआधी हॉल तिकीटं दिली जाणार आहे'

'सर्व शाळा आणि सेंटरची यादी तयार करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना दोन दिवसांआधी हॉल तिकीटं दिली जाणार आहे'

ज्यांना दुसरा लशीचा डोस दिला नाही तर पहिला डोस हा वाया जाऊ शकतो. म्हणून 18 ते 44 या वयोगटातील लशीचा साठा...

  मुंबई, 11 मे: राज्यात कोरोना (Maharashtra corona cases) संसर्ग रोखण्यासाठी लसीकरणावर भर दिला जात आहे. पण लशीचा साठा उपलब्ध नसल्यामुळे अनेक लसीकरण (Corona vaccination) केंद्र बंद पडली आहे. त्यामुळे 18 ते 44 वयोगटासाठी लशी या 45 वर्षांपुढील व्यक्तींना दिली जाणार आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh tope) यांनी दिली आहे. राजेश टोपे यांनी मुंबई पत्रकार परिषद घेऊन राज्यातील कोरोना परिस्थितीबद्दल केलेल्या उपाययोजनेची माहिती दिली. राज्यात अॅक्टिव्ह केस कमी होत आहे. बरे होण्याच्या दर वाढत आहे. 2 लाख टेस्टिंग राज्यात केले जात आहे. व्हॅक्सिसीन 1 कोटी 84 लाख झाले आहे. आता 35 हजार कोव्हॅक्सिन उपलब्ध आहे. राज्य शासनाने खरेदी केलेली 3 लाख कोव्हॅक्सिन 45 वर्षांवरील व्यक्तींना दिले जाणार आहे, त्यांना दुसरा डोस देणे गरजेचं आहे. त्यामुळे हे डोस 45 पुढील वयोगटांना दिले जाणार आहे, असं टोपे यांनी स्पष्ट केलं.

  'हे मोदी सरकारच्या घाणेरड्या मनोवृत्तीचे प्रतिक',काँग्रेसची मोदी सरकारवर टीका

  वय 18 ते 44 या वयोगटातील लस देण्याचे जाहीर केले होते. पण लशीचा साठा कमी प्रमाणात उपलब्ध आहे. ज्यांना दुसरा लशीचा डोस दिला नाही तर पहिला डोस हा वाया जाऊ शकतो. म्हणून  18 ते 44 या वयोगटातील लशीचा साठा हा 45 वरील वयोगट यासाठी वळवण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत फोनवर चर्चा केली आहे. त्यामुळे 18 वर्षांवरील लसीकरणाचा वेग काही दिवस स्लो डाउन करावे लागेल, टास्क फोर्स समवेत चर्चा करून कॅबिनेट चर्चा करून निर्णय करू, असंही टोपे यांनी स्पष्ट केले. म्युकोरमायकोसिस बाबत काही जिल्ह्यात हे रूग्ण आढळत आहेत. सरकारी रूग्णालयात माहत्मा फुले जनआरोग्य योजने अंतर्गत उपचार मोफत केले जाणार आहे. त्यासाठी लागणाऱ्या औषधाचा खर्च राज्य सरकार उचलणार आहे, असंही टोपेंनी जाहीर केलं. रेमडेसीवीर इंजेक्शन ग्लोबल टेंडर काढले जाणार आहे. ६ कंपन्या यासाठी इच्छुकता दाखवली आहे. साधरण प्रत्येक कंपनी किमान ५० हजार इंजेक्शन उपलब्ध करून देईल, असंही टोपेंनी सांगितले. व्हॅक्सिनबाबत ग्लोबल टेंडर काढणे कठीण आहे. कारण त्यासाठी केंद्र सरकारची परवानगी गरजेची आहे. केंद्र सरकरला विनंती केली आहे की व्हॅक्सिनसाठी परवानगी द्यावी लागेल, असंही टोपेंनी सांगितले.
  Published by:sachin Salve
  First published:

  Tags: Corona, Corona vaccination, Covid-19, Rajesh tope

  पुढील बातम्या