उस्ताद अमजद अली खान यांना मा. दीनानाथ पुरस्कार तर आशा भोसलेंना जीवनगौरव पुरस्कार प्रदान

सरोद वादक उस्ताद अमजद अली खान यांना मास्टर दिनानाथ पुरस्काराने गौरवण्यात आलं, तर ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनाही जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.

Renuka Dhaybar | Updated On: Apr 25, 2018 04:20 PM IST

उस्ताद अमजद अली खान यांना मा. दीनानाथ पुरस्कार तर आशा भोसलेंना जीवनगौरव पुरस्कार प्रदान

25 एप्रिल : नुकतंच दीनानाथ मंगेशकर पुरस्कारचं वितरण करण्यात आलं. मुंबईतल्या षण्मुखानंद सभागृहात हा वितरण सोहळा पार पडला. सरोद वादक उस्ताद अमजद अली खान यांना मास्टर दीनानाथ पुरस्काराने गौरवण्यात आलं, तर ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनाही जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.

यावेळी थिएटर आणि सिनेमातील उल्लेखनीय कामगिरीसाठी अनुपम खेर यांनाही मास्टर दीनानाथ पुरस्कार 2018 देण्यात आला. खेर यांनी या पुरस्काराची रक्कम सेंट्रल सोसायटी ऑफ एज्युकेशन या कर्णबधीर मुलांसाठी विनामूल्य काम करणाऱ्या संस्थेला दान केली.

सामाजिक उद्योजकतेसाठीचा दीनानाथ पुरस्कार मसाला किंग धनंजय दातार यांना देण्यात आला. तर वाग्विलासिनी पुरस्कार योगेश गौर यांना प्रदान करण्यात आला. याशिवाय मोहन वाघ स्मृती पुरस्कार सुयोग नाट्यसंस्थेच्या 'अनन्या' या नाटकाला देण्यात आला. यावेळी नाटकासह त्यात काम करणाऱ्या कलाकारांचाही विषेश गौरव करण्यात आला.

जीवनगौरव पुरस्कार मिळाल्यानंतर आशा भोसले यांनी आपल्या आवाजात खास गाणं सादर करून रसिकांची इच्छा पूर्ण केली.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 25, 2018 08:34 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close