मुंबई, 01 सप्टेंबर: एका बलात्कार प्रकरणी सुनावणी करत असताना मुंबईचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश संजश्री जे घरत यांनी एक महत्त्वपूर्ण टिप्पणी केली आहे. शारीरिक संबंध प्रस्थापित करताना कंडोम वापरला म्हणजे दोघांच्या सहमतीनं सेक्स झाला असा याचा अर्थ होतं नाही, अशी टिप्पणी न्यायालयानं दिली आहे. नौदलातील एका जवानानं त्याच्या मित्राच्या पत्नीवर बलात्कार केल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे. नुकताच न्यायालयानं आरोपीला जामीन मंजूर केला आहे. यावेळीच न्यायालयानं ही टिप्पणी केली आहे.
सुनावणी दरम्यान न्यायालयानं म्हटलं की, 'केवळ घटनास्थळी कंडोम होते, त्यामुळे आरोपीनं तक्रारदाराशी सहमतीनं संबंध प्रस्थापित केले होते, असं म्हणणं पुरेसं नाही. याचा अर्थ असाही होऊ शकतो की, भविष्यातील अडचणी टाळण्यासाठी कंडोमचा वापर केला गेला.' अशी टिप्पणी न्यायालयानं केली आहे.
हेही वाचा-सेम टीशर्ट घातल्यानं निष्पाप तरुणाचा गेला जीव; भयंकर कृत्यानं मुंबई हादरली
नेमकं प्रकरण काय?
भारतीय नौदलातील एका जवानानं त्याच्याच एका सहयोगी मित्राच्या पत्नीवर बलात्कार केल्याचा आरोप होता. हे प्रकरणावर सध्या न्यायालयात सुनावणी सुरू असून पोलीस तपास पूर्ण झाला आहे. पोलीस तपास पूर्ण झाल्यानंतर संशयित आरोपीच्या वकिलाकडून असा दावा करण्यात आला की, पीडितेसोबत ठेवण्यात आलेले शारीरिक संबंध दोघांच्या संमतीनं ठेवण्यात आले आहेत. या संबंधादरम्यान जवानाकडून कंडोम देखील वापरलं असल्याचा युक्तीवाद आरोपीच्या वकिलाकडून करण्यात आला होता.
हेही वाचा-22 वर्षाच्या तरुणीचं 41 वर्षीय व्यक्तीवर जडलं प्रेम; शेवट झाला अतिशय भयानक
पोलीस तपास पूर्ण झाल्यामुळे आरोपीला जामीन मंजूर करताना, न्यायालयानं महत्त्वपूर्ण टिप्पणी केली आहे. शारिरीक संबंधादरम्यान केवळ कंडोम वापरला म्हणून दोघांच्या संमतीनं सेक्स झाला असा याचा होतं नाही, असं न्यायालयानं म्हटलं आहे. सरकारी वकील कल्पना हिरे यांनी आरोपीच्या जामीन अर्जाला विरोध केला आहे. तसेच तपास संपला असला तरी आरोपी पीडितेला आणि तिच्या पतीला धमकावू शकतो, असा युक्तीवाद केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.