मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

मुंबई पोलिसांनी का जाहीर केले US Election च्या निकालांचे आकडे? धम्माल Tweet कनेक्शन

मुंबई पोलिसांनी का जाहीर केले US Election च्या निकालांचे आकडे? धम्माल Tweet कनेक्शन

मुंबई पोलीस (Mumbai Police) आणि अमेरिकेच्या निवडणुकीच्या निकालाचा (US Election) काय संबंध आहे असं तुम्ही म्हणाल ना? त्याला कारण आहे मुंबई पोलिसांचं हे भन्नाट ट्वीट

  • Published by:  Amruta Abhyankar
मुंबई, 07 नोव्हेंबर: अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुका (US Election) नुकत्याच पार पडल्या असून मतमोजणी सुरू आहे. अमेरिकाचा नवा राष्ट्राध्यक्ष कोण होणार याकडे फक्त अमेरिकाच नाही तर संपूर्ण जगाचं लक्ष लागून राहिलं आहे. पण अमेरिकेची निवडणूक आणि मुंबई पोलीस (Mumbai Police) यांचं काय कनेक्शन आहे? याचं उत्तर आहे मुंबई पोलिसांनी केलेलं एक ट्वीट. 100 या हेल्पलाइन क्रमांकावरुन मुंबईत असलेल्या कोणत्याही व्यक्तीला पोलिसांची मदत घेता येते. या हेल्पलाइन क्रमांकाची जनजागृती करण्यासाठी मुंबई पोलिसांच्या सोशल मीडियावर अकाऊंटवरुन नवनव्या कल्पना वापरल्या जातात. आताही तशीच एक भन्नाट आयडिया राबवण्यात आली आहे. अमेरिकेत जो बायडन (Joe Biden) आणि डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या निकालाचे आकडे सतत बदलत आहेत. अमेरिकेतल्या निवडणुकीच्या आकड्यांचा आधार घेत मंबई पोलिसांच्या ट्विटर हँडलवरुन एक भन्नाट ट्वीट करण्यात आलं आहे. या ट्वीटमध्ये लिहिलं आहे, ‘बायडन 264, ट्रम्प 214, मुंबई पोलीस 100  हा आकडा कधीही बदलणार नाही.’ गेल्या काही दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांचा 100 हा हेल्पलाइन क्रमांक बदलून 122 होणार आहे. अशी चर्चा रंगली होती. पण मुंबई पोलिसांचा हेल्पालइन नंबर बदलणार नाही. हेच या ट्वीटमधून दिसून येत आहे. मुंबई पोलिसांचं ट्विटर हँडल अतिशय सक्रीय आहे. या ट्विटर हँडलवरुन लोकांमध्ये जनजागृती करण्याचं काम केलं जातं. अमेरिकेल्या निवडणुकीच्या बदलणाऱ्या आकड्यांचा आधार घेऊन मुंबईतल्या जनतेला जागृत करणारं मार्मिक ट्वीट पोलिसांकडून करण्यात आलं आहे.
First published:

Tags: US elections

पुढील बातम्या