मुंबई, 01 डिसेंबर : अभिनेत्री ऊर्मिला मातोंडकर शिवसेनेमध्ये प्रवेश करणार हे अशी जोरदार चर्चा रंगली होती. अखेर या चर्चेला पूर्णविराम मिळाले आहे. ऊर्मिला मातोंडकर आज दुपारी 1 वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधणार हे आता निश्चित झाले आहे.
काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर आता ऊर्मिला मातोंडकर शिवसेनेत दाखल होणार आहे. आज दुपारी मातोश्रीवर हा प्रवेश सोहळा पार पडणार आहे. खुद्ध मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ऊर्मिला मातोंडकर यांचा जाहीर प्रवेश होत आहे. त्यानंतर
ऊर्मिला मातोंडकर पत्रकार परिषद घेणार आहे. या पत्रकार परिषदेत त्या त्यांची पुढील राजकीय वाटचाल कशी असेल या संदर्भात निर्णय जाहीर करणार आहेत.
शीतल आमटे यांच्या आत्महत्येनंतर कुटुंबीयांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
विशेष म्हणजे, शिवसेनेनं या आधीच त्यांचं नाव राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीत समावेश केले आहे. त्यामुळे राज्यपालांची मंजुरी मिळताच त्या विधान परिषदेत शिवसेनेच्या आमदार म्हणून आपली राजकीय कारकीर्द सुरू करणार आहेत. त्यापूर्वी त्यांना शिवसेना पक्षात अधिकृत पक्ष प्रवेश करावा लागणार आहे.
बँक व्यवहाराशी संबंधित या महत्त्वाच्या नियमात आजपासून बदल, RBI चा मोठा निर्णय
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सुद्धा ऊर्मिला यांच्या पक्षप्रवेशाबद्दल सोमवारी स्पष्ट केले होते. 'ऊर्मिला मातोंडकर या मुळच्या शिवसैनिकच आहे. कदाचित मंगळवारी त्या पक्षात प्रवेश करतील. ही शिवसेनेसाठी चांगलीच गोष्ट आहे. त्यांच्या प्रवेशामुळे महिला आघाडी मजबूत होईल' असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला होता.
ऊर्मिला मातोंडकर यांची राजकारणात एंट्री
2019 च्या लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर उर्मिला मातोंडकरने काँग्रेसमध्ये प्रवेश करत ही निवडणूक लढवली. मात्र, निवडणुकीच्या मैदानात त्यांना अपयश आलं. तसंच या निवडणुकीनंतर पक्षात मतभेद झाले आणि त्यामुळे मातोंडकर यांनी काँग्रेसपासून दूर जाण्याचा निर्णय घेतला होता. काही दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत हिने सुशांतच्या मुद्द्यावर ठाकरे सरकारला घेरण्याचा प्रयत्न केल्यानंतर उर्मिला आक्रमकपणे माध्यमांसमोर आली आणि तिने कंगनाला जोरदार प्रत्युत्तर दिलं होते.