मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /नवा सस्पेन्स, ऊर्मिला मातोंडकर आज शिवबंधन बांधणार? पत्रकार परिषदेत करणार घोषणा

नवा सस्पेन्स, ऊर्मिला मातोंडकर आज शिवबंधन बांधणार? पत्रकार परिषदेत करणार घोषणा

ऊर्मिला मातोंडकर  (Urmila Matondkar) आज पत्रकार परिषद घेणार आहे. या पत्रकार परिषदेत त्या त्यांची पुढील राजकीय वाटचाल कशी आणि कोणत्या राजकीय पक्षातून असेल या संदर्भात  निर्णय जाहीर करणार आहेत.

मुंबई, 01 डिसेंबर : अभिनेत्री ऊर्मिला मातोंडकर (Urmila Matondkar) शिवसेनेमध्ये (Shivsena) प्रवेश करणार हे अशी जोरदार चर्चा रंगली आहे. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackery) यांच्या उपस्थितीत ऊर्मिला मातोंडकर या शिवबंधन बांधणार असे जवळपास स्पष्ट झाले आहे. मात्र,  त्यांच्या पक्ष प्रवेशाबद्दल अजूनही सस्पेन्स कायम आहे.

सेनेत प्रवेश करण्याआधी ऊर्मिला मातोंडकर आज पत्रकार परिषद घेणार आहे. या पत्रकार परिषदेत त्या त्यांची पुढील राजकीय वाटचाल कशी आणि कोणत्या राजकीय पक्षातून असेल या संदर्भात  निर्णय जाहीर करणार आहेत. दरम्यान, ऊर्मिला यांच्या शिवसेनेच्या पक्षप्रवेशावरून संभम्र निर्माण झाले आहे. ऊर्मिला यांनी आपण शिवसेनेत पक्षप्रवेश करणार नाही, असं वृत्त दैनिक लोकमतने दिले आहे. सेनेच्या नेते संजय राऊत आणि अनिल परब यांनीही 'कदाचित' शब्दावर जोर देऊन ऊर्मिला सेनेत प्रवेश करतील, असं म्हटलं आहे. त्यामुळे ऊर्मिला काय भूमिका घेता हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

विशेष म्हणजे, शिवसेनेनं या आधीच त्यांचं नाव राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीत समावेश केले आहे. त्यामुळे राज्यपालांची मंजुरी मिळताच त्या विधान परिषदेत शिवसेनेच्या आमदार म्हणून आपली राजकिय कारकीर्द सुरू करणार आहेत. त्यापर्वी त्यांना शिवसेना पक्षात अधिकृत पक्ष प्रवेश करावा लागणार आहे.

त्यामुळे आज ऊर्मिला मातोंडकर शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधून शिवसेनेत पक्ष प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे. मातोंडकर यांच्या शिवसेना पक्ष प्रवेशामुळे शिवसेनेची महिला आघाडी अधिक बळकट होणार आहे.

First published:
top videos