PHOTOS : काँग्रेस उमेदवार उर्मिला मातोंडकर यांचा अनोखा प्रचार

PHOTOS : काँग्रेस उमेदवार उर्मिला मातोंडकर यांचा अनोखा प्रचार

काही दिवसांपूर्वीच राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी आता आपलं पूर्ण लक्ष लोकसभा निवडणुकीवर केंद्रीत केलं आहे.

  • Share this:

मुंबई, 1 एप्रिल : अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी काही दिवसांपूर्वीच काँग्रेसमध्ये प्रवेश केला. अभिनय सोडून राजकारणात आपलं नशीब आजमावत असलेल्या उर्मिला यांनी आता आपलं पूर्ण लक्ष लोकसभा निवडणुकीवर केंद्रीत केलं आहे. उत्तर मुंबईतून लोकसभा निवडणुकीचं तिकीट मिळालेल्या उर्मिला मातोंडकर रविवारी (31 मार्च) गोराईतील रिक्षा चालकांसोबत दिसल्या. गोराई येथील काँग्रेस ऑफिस जाण्याआधी त्यांनी येथील रिक्षा चालकांची भेट घेतली. या भेटी दरम्यानचे त्यांचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

View this post on Instagram

Charkop party members and people..let’s march ahead. Jai Hind 🇮🇳 #AapliMumbaichiMulgi

A post shared by Urmila Matondkar (@urmilamatondkarofficial) on

सध्या व्हायरल होत असलेल्या या फोटोंमध्ये उर्मिला रिक्षा चालकाच्या सीटवर बसलेल्या दिसत आहेत. काँग्रेस उमेदावार उर्मिला मातोंडकर 2019च्या लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवार गोपाळ शेट्टी यांच्या विरोधात निवडणूक लढवत आहेत. गोपाळ शेट्टी यांनी 2014च्या निवडणुकीत काँग्रेस नेता संजय निरूपम यांना हरवलं होतं. त्यामुळे यावेळी काँग्रेसनं चर्चेत असणाऱ्या चेहऱ्याला उमेदवारी देण्याचं ठरवलं होतं. त्यामुळे यावेळी उत्तर मुंबई मतदार संघांतून उर्मिला मातोंडकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

View this post on Instagram

Overwhelmed by all the love n support shown to me at the rally today. Jai Hind 🇮🇳#aaplimarathimulgi 🙏🏼

A post shared by Urmila Matondkar (@urmilamatondkarofficial) on

उर्मिला मातोंडकर यांच्या आधी 2004मध्ये याच जागेवर अभिनेता गोविंदानं लोकसभा निवडणूक लढवली होती आणि त्यावेळी त्यानं भाजप नेता राम नाईक यांना हरवलं होतं. मात्र त्यानंतर 2009ची निवडणूक गोविंदानं लढवली नाही. त्यामुळे ही जागा संजय निरुपम यांना मिळाली. पण आता या जागेची जबाबदारी उर्मिला मातोंडकर यांच्यावर आहे. त्यामुळे आता राजकारणात जनतेची मनं जिंकण्यात रंगीला गर्ल उर्मिला कितपत यशस्वी ठरते हे पाहणं उत्सुकतेच ठरणार आहे.

VIDEO: 'या नेत्याला ओळखा आणि 101 रुपये मिळवा'

First published: April 1, 2019, 1:54 PM IST

ताज्या बातम्या