विशेष म्हणजे, शिवसेनेनं या आधीच ऊर्मिला मातोंडकर यांचं नाव राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीत समावेश केले आहे. त्यामुळे राज्यपालांची मंजुरी मिळताच त्या विधान परिषदेत शिवसेनेच्या आमदार म्हणून आपली राजकीय कारकीर्द सुरू करणार आहेत. त्यापूर्वी त्यांना शिवसेना पक्षात अधिकृत पक्ष प्रवेश करावा लागणार होता, त्याची औपचारिकता अखेर आज पार पडली आहे. दरम्यान, ऊर्मिला मातोंडकर यांच्यावर शिवसेनेनं कोणती जबाबदारी सोपवली आहे, हे मात्र अजून गुलदस्त्यात आहे. आज संध्याकाळी 4 वाजेच्या सुमारास जुहू इथं ऊर्मिला मातोंडकर पत्रकार परिषद घेणार आहे. या पत्रकार परिषदेत शिवसेनेकडून आपल्याला कोणती जबाबदारी सोपवण्यात आली आहे, काय आपली भूमिका असणार आहे, याबद्दलचा खुलासा मातोंडकर करण्याची शक्यता आहे. ऊर्मिला मातोंडकर यांची राजकारणात एंट्री 2019 च्या लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर उर्मिला मातोंडकरने काँग्रेसमध्ये प्रवेश करत ही निवडणूक लढवली. मात्र, निवडणुकीच्या मैदानात त्यांना अपयश आलं. तसंच या निवडणुकीनंतर पक्षात मतभेद झाले आणि त्यामुळे मातोंडकर यांनी काँग्रेसपासून दूर जाण्याचा निर्णय घेतला होता. काही दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत हिने सुशांतच्या मुद्द्यावर ठाकरे सरकारला घेरण्याचा प्रयत्न केल्यानंतर उर्मिला आक्रमकपणे माध्यमांसमोर आली आणि तिने कंगनाला जोरदार प्रत्युत्तर दिलं होते.अभिनेत्री @UrmilaMatondkar जी यांनी आज मातोश्री निवासस्थानी शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत आणि सौ. रश्मीताई ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. pic.twitter.com/lAv21HjbaH
— ShivSena - शिवसेना (@ShivSena) December 1, 2020
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.