Elec-widget

शिवसेनेत प्रवेश करणार का? उर्मिला मातोंडकरांनी दिलं हे स्पष्टीकरण!

शिवसेनेत प्रवेश करणार का? उर्मिला मातोंडकरांनी दिलं हे स्पष्टीकरण!

उर्मिलांनी काँग्रेस श्रेष्ठींना पत्र पाठवून काही तक्रार केली होती. पण त्यावर उपययोजना न करता उलट अशा लोकांना पदं दिली गेलीत असा आरोप करत त्यांनी काँग्रेसला रामराम केला होता.

  • Share this:

मुंबई 17 सप्टेंबर : लोकसभेत भाजपला टक्कर दिल्यानंतर उर्मिला मातेंडकर (Urmila Matondkar) यांची राजकारणातली एंट्री गाजली होती. त्यानंतर सहा महिन्यांच्या आधीच त्यांनी मतभेदांमुळे पक्षातून राजीनामा दिला. त्यानंतर त्या शिवसेनेत(Shiv Sena) जाणार अशी चर्चा सुरू झाली होती. त्याबाबतची बोलणी झाल्याचं म्हटलं गेलं. या सगळ्या चर्चेनंतर उर्मिला मातोंडकरांनी पहिल्यांदाच स्पष्टिकरण दिलंय. त्या म्हणाल्या, मी इतर कोणत्याही पक्षात प्रवेश करत नाहीये. उगाच त्याचे आडाखे बंधू नयेत. हे माझ्याप्रती आणि त्या पक्षासाठी अन्यायकारक आहे असं उर्मिला मातोंडकर यांनी म्हटलंय. उर्मिलांनी काँग्रेस श्रेष्ठींना पत्र पाठवून काही तक्रार केली होती. पण त्यावर उपययोजना न करता उलट अशा लोकांना पदं दिली गेलीत असा आरोप करत त्यांनी काँग्रेसला(Congress) रामराम केला होता. महाराष्ट्र युवक काँग्रेसने उर्मिलांच्या मागण्यांना पाठिंबा देत त्यांची तक्रार योग्य असल्याचं म्हटलं होतं. तर मिलिंद देवरा यांनीही उर्मिलांना पाठिंबा दिला होता.

सेनेच्या नगरसेवकांची भाजपच्या आमदाराला शिवीगाळ; महापालिकत तुफान राडा

उर्मिलाच्या शिवसेना प्रवेशाची काय होती चर्चा?

उत्तर मुंबईतून काँग्रेसच्या उमेदवार म्हणून लोकसभा निवडणूक लढवलेल्या अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी काँग्रेस सोडल्यानंतर आता त्या शिवसेनेच्या मार्गावर असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. शिवसेनेचे सचिव मिलींद नार्वेकर यांना उर्मिला मातोंडकर यांनी फोन केल्यामुळे वेगळ्याच राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. यासंदर्भात नार्वेकर यांना विचारलं असता फोनवरील चर्चा ही मैत्रीतून होती. यावेळी कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याची माहिती त्यांनी दिली.

विधानसभेच्या तोंडावर शिवसेनेचा निर्णय, 5 ते 10 आमदारांना देणार डच्चू

Loading...

यासंदर्भात अधिक तपास केला असता उर्मिला मातोंडकर यांचे मराठी कलाकार म्हणून मातोश्रीशी चांगले संबध आहेत. काँग्रेसमध्ये असतानाही त्यांनी भाजपवर कडाडून टीका केली. मात्र, ठाकरे कुटुंबाशी असलेल्या चांगल्या मैत्रीपूर्ण संबधामुळे शिवसेनेवर त्यांनी कधीही टीका केली नव्हती. मातोश्रीनेही उर्मिला मातोंडकर यांच्याशी मराठी लेक म्हणूनच मैत्रीचे संबध कायम ठेवले होते. त्यामुळे आता हेच संबंध राजकीय होणार की काय अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.

VIDEO: जयराम रमेश यांनी केलं आदित्य ठाकरेंचं कौतुक

उर्मिला मातोंडकर यांनी काही दिवसांपूर्वी शिवसेना सचिव मिलींद नार्वेकर यांच्याशी फोनवरून चर्चा केली. मात्र, ही चर्चा राजकिय नसून ठाकरे कुटुंबाशी असलेल्या चांगल्या संबधामुळे चर्चा झाली असल्याचा खुलासा शिवसेना सचिन मिलींद नार्वेकर यांनी केला आहे. या भेटीला कुणीही राजकिय रंग देऊ नये अशी विनंती त्यांनी केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 17, 2019 03:57 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...