उर्मिला मातोंडकर यांचं ते पत्र नेमकं कुणी केलं उघड?

उर्मिला मातोंडकर यांचं ते पत्र नेमकं कुणी केलं उघड?

काँग्रेसच्या लोकसभा निवडणुकीच्या उमेदवार उर्मिला मातोंडकर यांनी काँग्रेस अध्यक्षांना लिहिलेलं पत्र उघड झाल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी मिलिंद देवरा यांच्यावर त्यांचं नाव न घेता टीका केली होती. ऊर्मिला मातोंडकर यांचं पत्र प्रसारमाध्यमांना दिलं गेलं, असाही आरोप त्यांनी केला होता.

  • Share this:

सागर कुलकर्णी

मुंबई, 9 जुलै : काँग्रेसच्या लोकसभा निवडणुकीच्या उमेदवार उर्मिला मातोंडकर यांनी काँग्रेस अध्यक्षांना लिहिलेलं पत्र उघड झाल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. या प्रकरणी काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी मिलिंद देवरा यांच्यावर त्यांचं नाव न घेता टीका केली होती. ऊर्मिला मातोंडकर यांचं पत्र प्रसारमाध्यमांना दिलं गेलं, असाही आरोप त्यांनी केला होता. पण आता हे पत्र उघड झाल्याबद्दल उर्मिला मातोंडकर यांनी संताप व्यक्त केला आहे.

'अंतर्गत गोष्टी बाहेर येणं खेदजनक'

या पत्रावर उर्मिला मातोंडकर यांनी तपशीलवार स्पष्टीकरण दिलं आहे. पक्षाचं अंतर्गत पत्र बाहेर येणं हे अत्यंत खेदजनक आहे. पक्षातले विषय पक्षातच चर्चा करून सोडवले जावेत, असं त्यांनी म्हटलं आहे. मी वैयक्तिक स्वार्थासाठी पक्षात प्रवेश केलेला नसून पक्षाच्या भल्यासाठी प्रवेश केला आहे, असंही त्या म्हणाल्या.

मिलिंद देवरांना लिहिलं पत्र

लोकसभा निवडणुकीपूर्वी संजय निरूपम यांच्याकडून मुंबई अध्यक्षपदाची धुरा काढून घेत मिलिंद देवरा यांच्याकडे देण्यात आली. पण, काँग्रेसला लोकसभा निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर उर्मिला मातोंडकर यांनी मिलिंद देवरा यांना पत्र लिहून काँग्रेस नेत्यांनी मदत न केल्याची तक्रार केली होती.हे पत्र सार्वजनिक झाल्यानंतर मुंबई काँग्रेसमधील सर्व गोष्टी समोर आल्या.

'मुख्यमंत्रिपदाचा अंतिम निर्णय हे 3 नेतेच घेणार'

उर्मिला मातोडंकर यांनी 16 मे ला निकालापूर्वी मिलिंद देवरा यांना हे पत्र लिहिलं होतं.काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी विरोधी पक्षाच्या उमेदवारांचं काम केलं, असं त्यांनी या पत्रात लिहिलं होतं. त्यांचं हे पत्र मिलिंद देवरा यांनीच प्रसारमाध्यमांना दिलं, असा सूर संजय निरुपम यांनी लावला होता. पण त्यांनी त्यामध्ये मिलिंद देवरा यांचं नाव घेतलं नव्हतं. असं असलं तरी हे पत्र प्रसारमाध्यमांना नेमकं कुणी दिलं हे अजून कळू शकलेलं नाही.

=====================================================================================

VIDEO: पावसामुळे भाजीपाल्याचे भाव वाढले, यासोबत इतर महत्त्वाच्या 18 बातम्या

First published: July 9, 2019, 4:32 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading