News18 Lokmat

'उरी- द सर्जिकल स्ट्राइक' सिनेमात काम करणाऱ्या या अभिनेत्याचं निधन

सिने अँड टीव्ही आर्टिस्ट एसोसिएशनने (सिंटा) त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून ही दुःखद बातमी शेअर केली.

News18 Lokmat | Updated On: Apr 9, 2019 11:53 AM IST

'उरी- द सर्जिकल स्ट्राइक' सिनेमात काम करणाऱ्या या अभिनेत्याचं निधन

मुंबई, ०९ एप्रिल- बॉलिवूडचा अभिनेता विकी कौशलच्या 'उरी- द सर्जिकल स्ट्राइक' सिनेमात काम केलेले अभिनेते नवतेज हुंडल यांचं निधन झालं. भारतीय सेनेद्वारे पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून केलेल्या सर्जिकल स्ट्राइकवर हा सिनेमा आधारित होता. या सिनेमात नवतेज यांनी गृहमंत्र्याची भूमिका साकारली होती. सिने अँड टीव्ही आर्टिस्ट एसोसिएशनने (सिंटा) त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून ही दुःखद बातमी शेअर केली. यावेळी सिंटाकडून नवतेज यांना श्रद्धांजलीही वाहण्यात आली.

सिंटाकडून करण्यात आलेल्या ट्वीटमध्ये लिहिले की, सिंटा नवतेज हुंडल यांच्या निधनाचं शोक व्यक्त करत आहे. त्यांच्या आत्म्याला शांती मिळो. त्यांचं अंत्यसंस्कार ओशीवरा क्रिमेटोरियम रिलीफ रोड, प्रकाश नगर ज्ञानेश्वरनगर जोगेश्वरी (प) येथे पार पडलं.नवतेज यांच्या पश्चात त्यांची पत्नी आणि दोन मुली आहेत. त्यांची मुलगी अवंतिका हुंडली एक अभिनेत्री असून ये हैं मोहब्बतें मालिकेत ती मिहिकाची व्यक्तिरेखा साकारत आहे. नवतेज यांनी याआधी खलनायक, तेरे मेरे सपने या सिनेमांमध्ये काम केलं आहे. अभिनयाशिवाय ते अभिनयाची कार्यशाळाही घ्यायचे.

Loading...

VIDEO: 'डे विथ लिडर' : असा सुरू होतो नवनीत राणां यांचा दिवस


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 9, 2019 11:44 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...