मुंबई, 31 डिसेंबर : सरत्या वर्षात कोरोनाच्या मुद्द्याबरोबरच हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन महाआघाडी सरकार व विरोधकांमध्ये जुंपली आहे. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Udhav Thackray) यांना लिहिलेल्या एका पत्रात हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन प्रश्न विचारले होते. यानंतर मुख्यमंत्र्यांनी आम्हाला हिंदुत्वासाठी कोणाच्याही सर्टिफिकेटची गरज नाही’, असं विधान केलं होतं.
त्यानंतर शिवसेनेच्या विभागप्रमुखाने अजान स्पर्धा आयोजित केल्याने गोंधळ उडाला होता. (या स्पर्धेशी काहीही संबंध नसल्याचं दक्षिण मुंबईतील शिवसेनेच्या विभागप्रमुखांनी खुलासा केला होता) त्यानंतर आता एका कॅलेंडरमुळे चर्चेला उधाण आलं आहे.
भाजप नेते अतुल भातखळकर यांनी या कॅलेंडरचा फोटो पोस्ट करीत शिवसेनेवर जहरी टीका केली आहे. या कॅलेंडरवर शिवशाही कॅलेंडर 2021 असं लिहिलं असून वरच्या दोन्ही कोपऱ्यात शिवसेना आणि युवासेना असाही उल्लेख करण्यात आला आहे. विशेष म्हणजे हे कॅलेंडर मराठी, इंग्रजीबरोबरच उर्दू भाषेतही आहे. या कॅलेंडरवर इस्लामिक महिना आणि इतर गोष्टी उर्दूमध्ये लिहिण्यात आल्या आहेत. अतुल भातखळकर यांनी या कॅलेंडरचा फोटो पोस्ट करीत, ‘शिवसेनेला हिंदुत्वाच्या सर्टिफिकेटची गरज नाही….’,असा खोचक टोला लगावला आहे.
शिवसेनेला हिंदुत्वाच्या सर्टिफिकेटची गरज नाही.... @OfficeofUT pic.twitter.com/HPbspXSq5Y
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) December 31, 2020
मोहाच्या दारुचा ब्रँड; या राज्याने तयार केली 'हेरिटेज मदिरा पॉलिसी'
काही दिवसांपूर्वी आयोजित केलेल्या अजान स्पर्धेवरुन बराच गोंधळ उडाला होता. यावरुन भाजपकडून शिवसेनेवर जोरदार टीका केली जात आहे. शिवशाहीच्या या कॅलेंडरवर हिदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे लिहिण्याऐवजी जनाब बाळासाहेब ठाकरे असंही लिहिण्यात आलं आहे. त्यामुळे यावरुनही शिवसेनेवर टीका केली जात आहे.