यू. पी. एस. मदान राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त

गणपतीनंतर लगेच नवरात्र, दसरा आणि दिवाळी हे मोठे सण आहेत. सणांचे दिवस लक्षात घेऊन आयोगाला निवडणुकांचं वेळापत्रक तयार करावं लागणार आहे.

News18 Lokmat | Updated On: Sep 5, 2019 07:05 PM IST

यू. पी. एस. मदान राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त

मुंबई 5 सप्टेंबर : राज्याचे सहावे राज्य निवडणूक आयुक्त म्हणून यू. पी. एस. मदान यांनी आज पदभार स्वीकारला. प्रशासनात अनेक मोठ्या जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळलेल्या आहेत. आता काही महिन्यांवर राज्यातल्या निवडणुका आल्या आहेत. काही दिवसांमध्येच आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. अशा पार्श्वभीवर निवडणुकीची सर्व जबाबदारी आता मदान यांच्यावर असणार आहे.

मदान 1983 मध्ये भारतीय प्रशासकीय सेवेत रूजू झाले होते. राज्याच्या मुख्य सचिवपदाचीही धुरा त्यांनी सांभाळली आहे. तत्पूर्वी त्यांनी राज्यात विविध ठिकाणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हाधिकारी व मंत्रालयात अपर मुख्य सचिव म्हणून सेवा बजावली. त्याचबरोबर त्यांनी भारत निवडणूक आयोगाच्या वतीने मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून राज्यातील लोकसभा व विधानसभा निवडणुकांचे काम पाहिले आहे. मुंबई महानगरप्रदेश विकास प्राधिकरणचे (एमएमआरडीए) आयुक्त आणि महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाचे (म्हाडा) मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणूनही ते कार्यरत होते.

प्रशासनाच्या विरोधात 'पिंपरी'त विरोधकांनी महापालिकेतच घातली 'पंगत'!

आयोगाचे सचिव किरण कुरुंदकर यांनी मदान यांचं स्वागत केलं. आयोगातील अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते. ज. स. सहारिया यांचा राज्य निवडणूक आयुक्तपदाचा कार्यकाळ काल 4 सप्टेंबरला संपला होता. विरोधी पक्षांनी EVM मशिन्स विरुद्ध आंदोलन छेडलं आहे. त्यात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आघाडी घेतलीय. या सगळ्या पार्श्वभूमीवर विरोधकांच्या शंकांच निरसन करत मदान यांना कारभार करावा लागणार आहे.

'ट्राफिक' नियमांपासून वाचण्यासाठी खास 'जुगाड', पोलिसही चक्रावले, VIDEO व्हायरल

Loading...

आचारसंहिता लागणार

13 ते 15 सप्टेंबरच्या दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा होण्याची शक्यता आहे. निवडणुकांच्या तारखांची घोषणा झाली की त्याच क्षणापासून आचारसंहिता लागू होते. या काळात सरकारवर निर्णय घेण्यासाठी अनेक बंधनं येतात. गणपतीनंतर लगेच नवरात्र, दसरा आणि दिवाळी हे मोठे सण आहेत. सणांचे दिवस लक्षात घेऊन आयोगाला निवडणुकांचं वेळापत्रक तयार करावं लागणार आहे. महाराष्ट्रात कोल्हापूर आणि सांगलीत महापूर आला होता. तिथलं पुनर्वसनाचं कामही जोरात सुरू आहे. त्यामुळे आयोगाला या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच तारखांची घोषणा करावी लागणार असून सर्वांचं लक्ष आयोगाच्या घोषणेकडे लागलं आहे.

VIDEO : दुकानाबाहेर साड्या पाहत होत्या महिला, बैलाने मागून येऊन दिली धडक

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 5, 2019 04:16 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...