आरे काॅलनीच्या जंगलातील आग आटोक्यात

आरे काॅलनीच्या जंगलातील आग आटोक्यात

संध्याकाळी 6.30 च्या सुमारास आरे काॅलनी जंगलात आग लागल्यामुळे वणवा पेटला

  • Share this:

मुंबई,03 डिसेंबर : गोरेगावमधील आरे काॅलनी जंगलात भीषण आग लागली होती. अखेर चार तासांच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आलं आहे.

आज संध्याकाळी 6.30 च्या सुमारास आरे काॅलनी जंगलात आग लागल्यामुळे वणवा पेटला. अरुणकुमार विद्या मार्गावर गोकुळधामजवळील जंगलात ही आग लागली होती. या आगीची भीषण दृश्य दूरपर्यंत दिसत होती. अग्निशमन दलाला आगीची माहिती दिल्यानंतर 10 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. मात्र, जंगलात घटनास्थळापर्यंत पोहोचण्यात अग्निशमन दलाला अडचणींचा सामना करावा लागला. अखेर अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी स्थानिक लोकांसह पोहोचले.

१०० स्वयंसेवकांची मदत घेऊन पेटलेला वणवा हा ओल्या झाडांच्या फांद्यांनी विझवण्यात आला.  गेल्या 4 तासांपासून आरे परिसराला होरपळून काढणारी आग अखेर नियंत्रणात आली आहे. अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नांनी आग आटोक्यात आली.  आरेच्या जंगलातील 4 किलोमीटरचा परिसर आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. यामध्ये मोठ्या प्रमाणावर वनसंपदा जळून खाक झाली आहे. परंतु, या आगीत 4 किलोमीटरचा परिसर  भक्ष्यस्थानी पडला. यामध्ये मोठ्या प्रमाणावर वनसंपदा जळून खाक झाली आहे. परंतु, जंगलात ही आग का आणि कुणी लावली याबद्दल अद्याप माहिती मिळू शकली नाही.

======================

First published: December 3, 2018, 7:19 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading