मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /सेना आमदार प्रकाश सुर्वेंच्या ऑफिसबाहेरचा पहिला VIDEO, कारमधील बॉक्समध्ये आढळले फटाके

सेना आमदार प्रकाश सुर्वेंच्या ऑफिसबाहेरचा पहिला VIDEO, कारमधील बॉक्समध्ये आढळले फटाके

पोलिसांनी गाडी ताब्यात घेतली आहे. गाडीची पाहणी केली असता फटाक्यांचे बॉक्स आढळून आले आहे.

पोलिसांनी गाडी ताब्यात घेतली आहे. गाडीची पाहणी केली असता फटाक्यांचे बॉक्स आढळून आले आहे.

पोलिसांनी गाडी ताब्यात घेतली आहे. गाडीची पाहणी केली असता फटाक्यांचे बॉक्स आढळून आले आहे.

मुंबई, 14 ऑगस्ट : स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्येला शिवसेना आमदाराच्या कार्यालयाबाहेर बेवारस कार आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे.  मुंबईतील दहीसर पूर्व अशोक वन परिसरात आमदार प्रकाश सुर्वे (shivsena MLA Prakash Surve) यांच्या कार्यालयाबाहेर ही संशयास्पद कार सापडली आहे. सुदैवाने या कारमध्ये फटाके (firecrackers ) आढळून आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  आमदार प्रकाश सुर्वे यांच्या कार्यालयाबाहेर एक चॉकलेटी रंगाची टाटा सुमो गाडी आढळून आली आहे. या गाडीमध्ये स्फोटकं असल्याची माहिती समोर आली होती. पण घटनास्थळी पोलिसांनी पोहोचून पाहणी केली असता फटाके असल्याचं निष्पन्न झालं

उद्या १५ आँगस्ट स्वातंत्र दिनाचा मोठा सोहळा याच कार्यालयाबाहेरील प्रांगणात होणार आहे. पोलिसांनी गाडी ताब्यात घेतली आहे. गाडीची पाहणी केली असता फटाक्यांचे बॉक्स आढळून आले आहे. मुंबई पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. कारची पाहणी केली असता बॉक्समध्ये फटाके असल्याचं समोर आलं. त्यामुळे सर्वांनी सुटकेचा श्वास सोडला.

पण, संपूर्ण कारमध्ये फटाकेचे बॉक्स कुणी ठेवले आणि ही गाडी प्रकाश सुर्वे कार्यालयाबाहेर का ठेवण्यात आली, याबद्दल अद्याप माहिती मिळू शकली नाही. पोलिसांनी गाडीतील सर्व कागदपत्र तपासून पाहिली, पण त्यावरून कुणाचीही ओळख पटली नाही.

Explainer: तालिबानकडे युद्धासाठी एवढा पैसा येतो कुठून? कोण पुरवतंय रसद?

'गेल्या पाच-सहा दिवसांपासून गाडी इथं उभी होती. या कारमध्ये स्फोटकं कुणी ठेवली, का ठेवली, याबद्दल आपल्याला काही माहिती नाही. जर नुसती कार सापडली असती तर समजू शकलो असतो पण स्फोटकांनी भरलेली गाडी सापडली आहे. उद्या स्वातंत्र्य दिन आहे, जर कुठे अनुचित प्रकार घडला असता तर त्याला कोण जबाबदार असतं, या प्रकरणाची सखोल चौकशी करावी', अशी मागणी सुर्वे यांनी केली.

दरम्यान, या गाडीमध्ये फटाके होते, गाडी कोणाची आहे आणि आमदारांच्या घराबाहेर सोडण्याचे कारण काय याचा तपास केला जातोय

अशी माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त दिलीप सावंत यांनी दिली.

First published: