तुम्ही मोठं व्हा आणि मोठा विचार करा, योगी आदित्यनाथांचा संजय राऊतांवर हल्लाबोल

तुम्ही मोठं व्हा आणि मोठा विचार करा, योगी आदित्यनाथांचा संजय राऊतांवर हल्लाबोल

मुंबईची फिल्मसिटी उत्तर प्रदेशला नेणार या चर्चेवरून राजकीय वातावरण चांगलंच तापलं...

  • Share this:

मुंबई, 02 डिसेंबर: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आहेत. मुंबईची मायानगरी अर्थात फिल्मसिटी (filmcity) उत्तर प्रदेशला (uttar pradesh) नेणार या चर्चेवरून राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. अखेर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (yogi adityanath) यांनी मोठा खुलासा केला आहे. मुंबईतील फिल्मसिटी उत्तर प्रदेशला नेणार नसून नव्यानं उभारणार असल्याचं योगी आदित्यनाथ यांनी सांगितलं आहे. 'तुम्ही मोठे व्हा आणि मोठा विचार करा', या शब्दात मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी शिवसेना खासदार संजय राऊत (Shiv sena leader Sanjay Raut)यांच्यावर तोफ दागली आहे.

हेही वाचा..ठाकरे सरकार घेणार आणखी एक महत्त्वाचा निर्णय, जातीवाचक नावं हद्दपार होणार

बॉलिवूडची फिल्मसिटी मुंबईतच राहणार आहे, असं उत्तर योगी आदित्यनाथ यांनी संजय राऊतांना दिलं आहे. काहीही हिसकावून घेणार नाही, ही तर खुली स्पर्धा, असा हल्लाबोल योगींनी शिवसेनेवर केला आहे. मुळात फिल्मसिटी ही काही वस्तू नाही. आम्ही नव्याने गोष्ट निर्माण करणार आहोत. ज्यांना योग्य वाटत असेल ते नक्की यात सहभागी होतील. तुम्हाला मोठं व्हावं लागणार आहे. मोठा विचार करावा लागणार आहे', असा टोलाही योगी आदित्यनाथ यांनी संजय राऊत यांना लगावला आहे.

मुख्यमंत्री योगी आदित्यानाथ यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितल की, 'उत्तर प्रदेशसाठी आजचा दिवस खूप मोठा आहे. उत्तर प्रदेशमध्ये अनेक उद्योग, धंदे सुरू करण्यात आले आहे. अनेक उद्योजक गुंतवणूक करणार आह. याचाच एक भाग म्हणून उत्तर प्रदेशमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरील फिल्मसिटी उभारण्याचा आमचा प्रयत्न आहे. नोएडा परिसरात 1 हजार हेक्टर परिसरात भव्य फिल्मसिटी उभारणार आहोत.

'कुणी कुणाची काही वस्तू घेऊन जात नाही. मुळात हे काही कुणाची पर्स उचलून नेण्याचा प्रकार नाही. ही एक खुली स्पर्धा आहे. जो चांगली सुविधा देईल, सुरक्षा देईल, सामाजिक सुरक्षा आणि कुणासोबतही इथं भेदभाव होणार नाही, असं वातावरण देईल, अशी ही स्पर्धा आहे. एक भारत आणि श्रेष्ठ भारतासाठी वातावरण देण्याची गरज आहे, त्यासाठीच आमचा हा प्रयत्न आहे, असंही योगी आदित्यनाथ यांनी स्पष्ट केलं.

मुंबईतील फिल्मसिटी ही मुंबईत काम करेल, उत्तर प्रदेशमध्ये नव्याने फिल्मसिटीची उभारणी करण्यात येत आहे. त्यामुळे या क्षेत्रातील दिग्गज लोकांशी चर्चा केली. त्यांच्या अनुभवातून चांगली फिल्मसिटी निर्माण होईल. फक्त एका क्षेत्रासाठी नसून संपूर्ण जगात एक मॉडेल निर्माण होईल यासाठी आमचा प्रयत्न आहे', असंही योगी आदित्यनाथ यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा.. मुलांकडे लक्ष द्या! खेळता खेळता फुगा गिळल्यामुळे 4 वर्षांच्या देवराजचा मृत्यू

आम्ही कुणाच्याही क्षेत्राला बाधा पोहोचवत नाही, कोणत्याही राज्याचा विकास रोखत नाही. आम्ही भारताची आर्थिक स्थितीला कशी चालना देता येईल, यासाठी आमचा हा प्रयत्न आहे. पंतप्रधान मोदी यांनी देशाच्या आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी जे कार्य सुरू केले आहे. त्यात उत्तर प्रदेश आपल्याकडून योगदान देत आहे', असंही योगी आदित्यनाथ यांनी सांगितलं.

Published by: Sandip Parolekar
First published: December 2, 2020, 4:37 PM IST

ताज्या बातम्या