मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

...तोपर्यंत आपल्याला चीनसमोर झुकावे लागणार, मोहन भागवतांचे मोठे विधान

...तोपर्यंत आपल्याला चीनसमोर झुकावे लागणार, मोहन भागवतांचे मोठे विधान

 

 'आज आपण इंटरनेटचा वापर करतोय, नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करतोय. पण हे तंत्रज्ञान आपल्याला शेजारी राष्ट्रातून मिळतं'

'आज आपण इंटरनेटचा वापर करतोय, नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करतोय. पण हे तंत्रज्ञान आपल्याला शेजारी राष्ट्रातून मिळतं'

'आज आपण इंटरनेटचा वापर करतोय, नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करतोय. पण हे तंत्रज्ञान आपल्याला शेजारी राष्ट्रातून मिळतं'

  • Published by:  sachin Salve
मुंबई, 15 ऑगस्ट : आज आपण इंटरनेट आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत आहोत. पण ते आपल्या देशात तयार होत नाही. त्यामुळे आपल्याला शेजारील चीन (china) राष्ट्रावर अवलंबून राहावे लागत आहे, त्यामुळे आपल्याला चीनसमोर झुकावे लागणार आहे' असं विधान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत (rss chief mohan bhagwat) यांनी केलं. आज स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने (Independence Day) मुंबईच्या राजा शिवाजी महाविद्यालयात आज सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. आज भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त खास त्यांना आमंत्रित करण्यात आले होते. यावेळी, आपल्या भाषणात सरसंघचालकांनी चीनबद्दल भाष्य केलं, असं वृत्त दिव्य मराठीने दिलं आहे. Indian Idol 12 Finale: नचिकेत लेले ते सवाई भट्ट, एक्स स्पर्धक पोहोचले मंचावर सिकंदरने भारतात आक्रमण करण्यापूर्वी अनेकांच्या रांगा लागल्या होत्या. मात्र आपण त्याला 15 ऑगस्टला पूर्णविराम मिळाला. 15 ऑगस्ट 1947 ला भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि आपल्याला आपला देश मिळाला, असं यावेळी मोहन भागवत म्हणाले. 'आज आपण इंटरनेटचा वापर करतोय, नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करतोय. पण हे तंत्रज्ञान आपल्याला शेजारी राष्ट्रातून मिळतं. आपण कितीही आरडाओरडा केला तरी आपल्या फोनमध्ये या ज्या वस्तू आहेत त्या चीनमधून आलेल्या आहे. जोपर्यंत आपण चीनवर अवलंबुन राहणे कमी करणार नाही, तोपर्यंत आपल्याला चीनसमोर झुकावे लागणार आहे', असं मोहन भागवत म्हणाले. 16 दिवस आणि 1400 किमी... धोनीच्या चाहत्याने हद्दच केली राव! देशात कोरोनाने थैमान घातले होते. पण, आज लसीकरण आता सुरू झाले आहे. लसीकरण पूर्ण झाल्यावर कोरोनातून आपण मुक्त होऊ. पण, जग इथं संपलेलं नाही. ते जिथून आले त्यांचं केंद्रबिंदू आपल्याला जाणून घ्यावे लागले. त्याचा अभ्यास केला पाहिजे. ते जर आपल्याला कळाले तर आपल्याला अमरत्त्व प्राप्त होईल, त्यामुळे विद्या ही शिकलीच पाहिजे, असा सल्लाही भागवत यांनी विद्यार्थ्यांना दिला.
First published:

Tags: Independence day, RSS

पुढील बातम्या