मुंबई, 23 ऑक्टोबर : अनलॉकच्या 5 व्या टप्प्यात उद्धव ठाकरे सरकारनं अखेर जिम उघडण्याची परवानगी दिली आहे. 25 तारखेपासून जिम सुरू होणार आहे. कंटनेमेन्ट झोन वगळता राज्यात जिम सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. केंद्र आणि राज्य सरकारनं आखून दिलेल्या नियमांचं पालन करून ही जिम सुरू कऱण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे आता व्यायाम करण्यासाठी जिमला जाता येणार आहे.
राज्यात कोरोनाचा विळखा अधिक घट्ट होत असल्यामुळे 23 मार्च ते 31 मे लॉकडाऊन होता. त्यानंतर अनलॉकच्या टप्प्यांमध्ये हळूहऴू अर्थव्यवस्थेची एक एक कडी खुली करून देण्यात आली. राज्यात आता 25 तारखेपासून जिम सुरू कऱण्याची परवानगी महाविकास आघाडी सरकारकडून देण्यात आली आहे. SOS नुसार जिम सुरू होणार आहे.
हे वाचा-ट्रायलशिवायच भारतात दिली जाणार वादग्रस्त परदेशी लस, मोदी सरकारनं दिली परवानगी
नागरिकांना जिममध्ये जाताना मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन कऱणं अनिवार्य असेल. याशिवाय जिममध्ये थर्मल स्क्रिनिग आणि सॅनिटायझेशन अत्यावश्यक असेल. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी पूर्ण काळजी घेऊन कंटेनमेंट झोन वगळता राज्यात जिम सुरू कऱण्याची परवानगी ठाकरे सरकारनं दिली आहे. जीम सुरू करावी अशी मागणी गेले काही दिवस होती याबाबत आता निर्णय झाला आहे.
महाराष्ट्रात Recovery Rate हा 88 टक्क्यांच्या पुढे गेला आहे. गुरुवारी 16 हजार 177 रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्य ही 16 लाख 31 हजार 856 एवढी झाली आहे. राज्यात दिवसभरात 7 हजार 539 नवीन रुग्णांचे निदान झालं. तर 198 रुग्णांचा मृत्यू झाला. मृत्यू दर हा 2.64 टक्के एवढा झाला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus