मुंबई विद्यापीठ निकाल लावण्यातही 'नापास', ३६ हजार विद्यार्थ्यांचे पुर्नमूल्यांकनासाठी अर्ज

मुंबई विद्यापीठ निकाल लावण्यातही 'नापास', ३६ हजार विद्यार्थ्यांचे पुर्नमूल्यांकनासाठी अर्ज

ज्या विद्यार्थ्यांचे निकाल लावण्यात आलेत त्यांच्या निकालांमध्येही मोठे गोंधळ झाले आहे. तब्बल ३६ हजार ३३२ विद्यार्थ्यांनी पुर्नमूल्यांकनासाठी अर्ज केले आहे.

  • Share this:

16 सप्टेंबर : मुंबई विद्यापीठ विद्यार्थ्यांचे निकाल लावण्यात अपयशी ठरलंय. भरात भर म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचे निकाल लावण्यात आलेत त्यांच्या निकालांमध्येही मोठे गोंधळ झाले आहे. तब्बल ३६ हजार ३३२ विद्यार्थ्यांनी पुर्नमुल्यांकनासाठी अर्ज केले आहे.

मुंबई विद्यापिठाने विविध शाखांचे निकाल लावण्यासाठी वेळोवेळी डेडलाईन दिली पण एकदाही डेडलाईन न पाळता आल्यामुळे आपल्याच भोंगळ कारभाराचा जगजाहीर खुलासाच केला. एवढंच नाहीतर ज्या विद्यार्थांचे निकाल लावले त्यातही गोंधळ घालून ठेवलाय. त्यामुळे निकाल लागलेल्या २२ हजारहून अधिक विद्यार्थ्यांनी पुर्नमुल्यांकनासाठी अर्ज केल्याची माहिती स्वत: कुलगुरूंनी दोन दिवसांपूर्वी दिली होती. आता याची संख्या ३६ हजार ३३२ झालीये. त्यामुळे विद्यापीठा सामोरं आणखी एक नवे संकट उभे राहिलंय.

आता पुर्नमुल्यांकनासाठी हजारो विद्यार्थ्यांचे अर्ज आल्याने विद्यापीठ प्रशासन चांगलेच हादरून गेलंय. ऑनलाईन असेसमेंट निकाल प्रक्रियेत अनेक गंभीर त्रुटी दिसून आल्यात. परीक्षेत बसलेल्या काही विद्यार्थ्यांना चक्क गैरहजर दाखवण्यात आलंय. तर काही हुशार विद्यार्थ्यांना शून्य मार्क देण्याचा प्रतापही घडलांय. त्यामुळे विद्यापीठाची प्रतिष्ठा धुळीस मिळालीय.

First published: September 16, 2017, 9:17 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading