मुंबई विद्यापीठाचे अजूनही 86 विभागाचे निकाल बाकीच !

मुंबई विद्यापीठाचे अजूनही 86 विभागाचे निकाल बाकीच !

मुंबई विद्यापीठाच्या निकालाची आजची डेडलाईनही संपली. ३४० पैकी २५४ निकाल विद्यापीठाकडून लावण्यात आले आहेत.

  • Share this:

प्राजक्ता पोळ, मुंबई

05 आॅगस्ट : मुंबई विद्यापीठाच्या निकालाची आजची डेडलाईनही संपली. ३४० पैकी २५४ निकाल विद्यापीठाकडून लावण्यात आले आहेत. अजून 86 विभागाचे निकाल बाकी आहे.

राज्यपाल विद्यासागर राव यांनी मुंबई विद्यापीठाला ३१ जुलैची डेडलाईन वाढवून ही ५ ऑगस्ट दिली होती. पण तरीही  कुलगुरूंनी मात्र निकाल लागण्यासाठी १५ ऑगस्ट उजाडणार असल्याचं सांगितलंय. विद्यापीठाच्या  या भोंगळ कारभारामुळे लागलेल्या निकालांमध्येही घोळ झाल्याचं समोर आलंय. तसंच रखडलेल्या निकालामुळे  विद्यार्थ्यांचे हॉस्टेलसह इतर प्रवेशही रखडले आहेत.

निकाल दाखवल्याशिवाय हॉस्टेलला प्रवेश मिळत नाहीये. आता निकाल जरी लागले तरी त्याच्या पुढच्या सर्व प्रक्रियेवर याचा परिणाम होणार असल्याचं विद्यार्थ्यांकडून सांगण्यात येतंय.

ऑनलाईन निकाल लागला तर गुणपत्रिका कधी मिळणार याची चिंता विद्यार्थ्यांना लागलीये. कारण त्यावर हॉस्टेलचे प्रवेश पुढील अभ्यासक्रमांचे प्रवेश, नोकरी हे सर्व अवलंबून आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमधला संतापही वाढतोय.  डेडलाईन वर डेडलाईन देणं बंद करून लवकर आमचे निकाल लावा आणि त्वरीत कुलगुरूंचा राजीनामा घ्या अशी मागणी विद्यार्थी करत आहेत.

First published: August 5, 2017, 10:56 PM IST

ताज्या बातम्या