विद्यापीठांच्या परीक्षा, अॅडमिशनबाबत होणार मोठे निर्णय, UGC ने केल्यात 'या' शिफारसी

विद्यापीठांच्या परीक्षा, अॅडमिशनबाबत होणार मोठे निर्णय, UGC ने केल्यात 'या' शिफारसी

कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊनमुळे देशातल्या 47 लाख महाविद्यालयाच्या परीक्षा रखडल्या आहेत.

  • Share this:

मुंबई, 29 एप्रिल : महाराष्ट्रात कोरोना व्हायरसनं थैमान घातलं आहे. त्याच पार्श्वभूमीवर 47 लाख महाविद्यालयाच्या परीक्षा रखडल्या आहेत. या परीक्षा होणार की नाही याच संदर्भात अनेक प्रश्न विद्यार्थी आणि पालकांच्या मनात होते. विद्यापीठांच्या रखडलेल्या परीक्षा 1 ते 31 जुलै या कालावधीत घेण्यात याव्यात अशी शिफारस विद्यापीठ अनुदान आयोगाने परीक्षा आणि शैक्षणिक वर्ष वेळापत्रक तयार करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीने केल्या आहेत. वेगवेगळी विद्यापीठं आहेत. त्यानुसार परीक्षा पद्धतीही वेगळ्या आहेत त्यामुळे यासंदर्भात नियोजन सुरू असल्याचं सांगितलं जात आहे.

परीक्षा घेताना विद्यापीठांनी बहुपर्यायी, ओएमआर आधारित परीक्षा, ओपन बुक परीक्षा, प्रकल्पाधारीत परीक्षा या पर्यायांची वापर करावा. यासोबतच 70 गुणांची परीक्षा विद्यापीठनं घ्यावी, तर ३० गुणांची परीक्षा अंतर्गत मूल्यमापनाद्वारे घ्यावी, अशी शिफारसही यात करण्यात आली आहे.

हे वाचा-पुण्यात कोरोनाचे आकडे सतत वाढत असताना ससूनमधून आली 'गुड न्यूज'

1 ऑगस्टपासून अॅडमिशन प्रोसेस सुरू करावी आणि सप्टेंबरपासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू करण्यात यावं अशी शिफारस करण्यात आली आहे. यंदा विद्यार्थ्यांना हिवाळ्यात दिवाळी आणि ख्रिसमससाठी दिली जाणारी सुट्टी रद्द होण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. कोरोनामुळे महाविद्यालयातील परीक्षा आणि प्रवेश प्रक्रिया लांबणीवर पडल्यामुळे शैक्षणिक वर्ष उशिरा सुरू होणार आहे. अभ्यासक्रम वेळेत पूर्ण व्हावा यासाठी दिल्या जाणाऱ्या मोठ्या सुट्ट्या रद्द होणार का? असाही प्रश्न आहे.

यंदा पहिल्यांदाच शैक्षणिक वर्ष जून ते जून न राहात सप्टेंबर ते जुलै असे ठेवण्यात यावं अशी शिफारस करण्यात आली आहे. 1 ते 31 ऑगस्टपर्यंत महाविद्यालयीन अंतर्गत प्रवेश प्रक्रिया पूर्ण करून सप्टेंबरपासून नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात करावी. टर्म परीक्षा 1 जानेवारी ते 25 जानेवारी 2021 तर वार्षिक परीक्षा 1 ते 31 जुलै 2021 अशी घेण्यात येईल अशी शिफारस समितीकडून करण्यात आली आहे.

हे वाचा-इतक्या दिवसांचा असावा लॉकडाऊन, आनंद महिंद्रा यांनी सरकारला दिला सल्ला

संपादन- क्रांती कानेटकर

First published: April 29, 2020, 9:52 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading