S M L

'युनिव्हर्सल हायस्कूल'नं काढून टाकलेल्या 70 विद्यार्थ्यांना पुन्हा शाळेत घेतलं

पण मनमानी फी वाढीचं काय हा प्रश्न अनुत्तरीतच राहतो.ही अव्वाच्या सव्वा वाढलेली फी शाळा अजूनही रद्द का करत नाहीये ?

Sonali Deshpande | Updated On: May 31, 2017 03:52 PM IST

'युनिव्हर्सल हायस्कूल'नं काढून टाकलेल्या 70 विद्यार्थ्यांना पुन्हा शाळेत घेतलं

31 मे : दहिसरमधील युनिव्हर्सल शाळेसमोर युवा सेनेनं सुरू केलेल्या आंदोलनाला अखेर यश आलंय. फी न भरण्यावरून शाळेतून कमी केलेल्या 70 विद्यार्थ्यांना पुन्हा शाळेत घ्यायला प्रशासनाने तुर्तास होकार दिलाय.

दहिसरच्या युनिव्हर्सल शाळेने फी न भरल्याच्या कारणावरून या मुलांना शाळेतून काढून टाकलं होतं. त्यानंतर पालकांनी शाळा प्रशासनाविरोधात आंदोलन पुकारलं. या विषयावर शिक्षणमंत्र्यांचीही त्यांनी भेट घेतली होती. मात्र त्यांना कोणतंही ठोस उत्तर मिळू शकलेलं नव्हतं.

अखेर आज युवासेनेने या शाळेविरोधात आंदोलन करून शाळा प्रशासनाला याबाबत जाब विचारला. त्यानंतर मुजोर प्रशासनं नमलं आणि त्यांनी विद्यार्थ्यांना पुन्हा घ्यायचं आश्वासन दिलंय. आयबीएन लोकमतनेही या बातमीचा सातत्याने पाठपुरावा केला होता.पण मनमानी फी वाढीचं काय हा प्रश्न अनुत्तरीतच राहतो.ही अव्वाच्या सव्वा वाढलेली फी शाळा अजूनही रद्द का करत नाहीये. शिक्षण मंत्री विनोद तावडे यासाठी शाळेविरोधात कारवाई का करत नाही असा प्रश्न पालक उपस्थित करताहेत

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 31, 2017 01:58 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close