कर्णबधीर मुलीवर झालेल्या सामुहिक बलात्काराच्या विरोधासाठी महाराष्ट्र राज्य कर्णबधिर संघटना उतरली रस्त्यावर

कर्णबधीर मुलीवर झालेल्या सामुहिक बलात्काराच्या विरोधासाठी महाराष्ट्र राज्य कर्णबधिर संघटना उतरली रस्त्यावर

निदर्शन करणारे १००० हून अधिक लोक हे कर्णबधिर होते

  • Share this:

मुंबई, २३ जुलैः चेन्नई येथील एका अपार्टमेन्टमध्ये ११ वर्षीय मुलीवर सुमारे ७ महिने सामुहिक बलात्कार करण्यात आल्याच्या घटनेने संपूर्ण देशात संतापाची लाट पसरली आहे. या घटनेचा विरोध म्हणूनच महाराष्ट्र राज्य कर्णबधीर असोसिएशच्या एकता संघटनेतील कर्णबधिर लोकांनी दादर स्थानक ते शिवाजी पार्क असा मोर्चा काढत काल निदर्शन केले. निदर्शन करणारे १००० हून अधिक लोक हे कर्णबधिर होते. यावेळी त्यांनी आरोपींना लवकरात लवकर फाशी व्हावी अशी मागणी केली.

११ वर्षीय कर्णबधिर मुलीवर २२ जणांनी ७ महिने सामुहिक बलात्कार केला. यातील १८ जणांना अटक करण्यात आली असून इतरांचा शोध सुरू आहे. बलात्कार करणाऱ्यांमध्ये सिक्युरिटी गार्ड, प्लंबर आणि दुरूस्ती करणाऱ्या कामगारांनी तिच्यावर बलात्कार केला. अपार्टमेन्टच्या ६६ वर्षाच्या सिक्युरिटी गार्ड रवीने तिच्यावर पहिल्यांदा बलात्कार केला. रवीच तिला शाळेच्या बसपासून बेसमेंटपर्यंत, सार्वजनिक शौचालय, गच्ची आणि जिममध्ये घेऊन जायचा. तिकडे नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार करायचा. त्या सोसायटीमध्ये अनेक घरं रिकामी होती. त्या घरातही पीडितेवर अत्याचार झाले असतील असा संशय पोलिसांना आहे.

सर्व आरोपी हे यूके फॅसिलिटी सर्विस या खाजगी संस्थेचे कामगार आहेत. आरोपींनी मुलीला इंजेक्शन, कोल्ड ड्रींक आणि अन्य पदार्थांमधून गुंगीचे औषध दिले. आई- वडिलांना सांगितलं तर तुला अजून त्रास देऊ अशी धमकीही त्या मुलीला दिली. मुलीची बहिण दिल्लीवरुन चैन्नईला घरी राहायला आली असता पीडितेने तिच्या पोटात दुखत असल्याचे सांगितले. वैद्यकीय तपासणीनंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे समोर आले.

हेही वाचा-

मी उद्या महापूजेसाठी पंढरपूरला जाणार नाही - मुख्यमंत्री

Bigg Boss Marathi अभिनेत्री मेघा धाडे ठरली 'बिग बॉस'

Bigg Boss Marathi- आस्ताद काळे टॉप ५ मधून बाहेर...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 23, 2018 10:23 AM IST

ताज्या बातम्या