Union
Budget 2023

Highlights

मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

सॅल्यूट ! प्रोटोकॉल बाजूला ठेवत केंद्रीय मंत्री भागवत कराड यांनी विमानात केले आजारी प्रवाशावर उपचार, पाहा PHOTO

सॅल्यूट ! प्रोटोकॉल बाजूला ठेवत केंद्रीय मंत्री भागवत कराड यांनी विमानात केले आजारी प्रवाशावर उपचार, पाहा PHOTO

प्रोटोकॉल बाजूला ठेवत केंद्रीय मंत्री भागवत कराडांनी केले रुग्णावर उपचार, पाहा PHOTO

प्रोटोकॉल बाजूला ठेवत केंद्रीय मंत्री भागवत कराडांनी केले रुग्णावर उपचार, पाहा PHOTO

union minister bhagvat karad helps patient: केंद्रीय मंत्री भागवत कराड यांच्यातील डॉक्टरने प्रवाशाचे प्राण वाचवले आहेत.

मुंबई, 16 नोव्हेंबर : भाजपचे खासदार भागवत कराड (MP Bhagwat Karad) यांना काही दिवसांपूर्वीच केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळाले. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री असलेले भागवत कराड हे पेशाने डॉक्टर आहेत. डॉक्टर असलेल्या भागवत कराड (Dr Bhagwat Karad) यांनी प्रोटोकॉल बाजूला ठेवत विमानात एका प्रवाशाचे प्राण वाचवले आहेत. इंडिगो एअरलाईन्स (Indigo Airlines)मध्ये घडलेला हा संपूर्ण प्रकार स्वत: मंत्री भागवत कराड यांनी आपल्या फेसबूकवर एका पोस्टच्या माध्यमातून शेअर केला आहे. (Union Minister Bhagwat Karad helps patient in flight)

भागवत कराड हे 15 ऑक्टोबर रोजी इंडिगो एअरलाईन्सच्या फ्लाईटने प्रवास करत होते. विमानातून प्रवास करत असताना डॉ भागवत कराड यांच्या मागील बाजुच्या सीटवर बसलेल्या प्रवाशांचा गोंधळ सुरू झाला. त्यावेळी भागवत कराड यांनी पाहिले असता एका व्यक्तीची प्रकृती खालावल्याचं त्यांना दिसून आलं. त्यानंतर त्यांनी प्रोटोकॉल बाजूला ठेवत आणि क्षणाचाही विलंब नकरता या प्रवाशाच्या मदतीला धाव घेतली.

हा संपूर्ण घडलेला प्रकार भागवत कराड यांनी आपल्या फेसबूक पोस्टमध्ये सांगितला आहे. आपल्या फेसबूक पोस्टमध्ये त्यांनी लिहिलं, "प्रवास कर्तव्यदक्षतेचा... काल प्रवासादरम्यान इंडिगो फ्लाइट IndiGo मध्ये 12 A सीटवर बसलेल्या एका प्रवाशाला अचानक गंभीर आरोग्य समस्या उद्भवली व तो कोसळून पडला. मी समोरच्या सीटवर होतो विमानात अचानक कुजबुज सुरू झाली आणि मला कळाले. एका क्षणाचा देखील विलंब न करता, कुठलाही मिनिस्ट्री प्रोटोकॉल विचारात न घेता मी एक डॉक्टर म्हणून त्याला ताबडतोब सुश्रुषा केली."

वाचा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या वर्षा निवासस्थानी सलग दुसऱ्या दिवशी कोविड रुग्णांची नोंद

भागवत कराड यांनी आपल्या पोस्टमध्ये पुढे म्हटलं, "आपल्या अनुभवामुळे जेव्हा एखाद्या गरजूला मदत होते तेव्हा मिळणारे समाधान हे खूप मोठे असते, याची काल परत एकदा अनुभूती घेतली. आपली भारतीय संस्कृती आपल्याला कायमच हे शिकवते. " एक मेका साह्य करू अवघे धरू सुपंथ " संतांची हि शिकवन कायम लक्षात ठेवा व मदतीसाठी पुढाकार घ्या."

भागवत कराडांना काही दिवसांपूर्वीच केंद्रीय मंत्रिमंडळात संधी

जुलै महिन्यात केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला. या मंत्रिमंडळात 15 कॅबिनेट आणि 28 राज्यमंत्र्यांसह एकूण 43 जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. ज्यामध्ये महाराष्ट्रातून नारायण राणे, कपिल पाटील, भागवत कराड आणि डॉ. भारती पवार यांना स्थान मिळाले.

डॉ. भागवत कराड

डॉ. भागवत कराड यांना केंद्रीय अर्थ राज्यमंत्रीपद देण्यात आलं आहे.

नारायण राणे

नाराय राणे यांच्याकडे सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. हे खातं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे होतं.

कपिल पाटील

भिवंडीतील भाजपचे खासदार कपिल पाटील यांना केंद्रीय राज्यमंत्रीपदाची शपथ देण्यात आली. पाटील यांच्याकडे पंचायत राज मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे.

डॉ. भारती पवार

डॉ. भारती पवार या राज्यातून मंत्रीपद मिळालेल्या एकमेव महिला मंत्री आहेत. दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या खासदार असलेल्या भारती पवार यांची केंद्रीय राज्यमंत्रीपदी वर्णी लागली आहे. भारती पवार यांच्याकडे आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याची पदभार सोपवण्यात आला आहे.

First published:

Tags: BJP, महाराष्ट्र