मुंबई, 7 जुलै: केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार (Union Cabinet Expansion) करण्यात येत आहे. नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या दुसऱ्या टर्ममधील हा पहिलाच मंत्रिमंडळ विस्तार असून अनेक नव्या चेहऱ्यांना यामध्ये संधी देण्यात येत आहे. या मंत्रिमंडळ विस्तारात एकूण 43 जण शपथ (43 leaders to take oath) घेणार असल्याची माहिती समोर आली असून त्यात महाराष्ट्रातील नारायण राणे (Narayan Rane), कपिल पाटील (Kapil Patil) यांच्यासह एकूण चार नेत्यांचा समावेश आहे. नारायण राणे आणि कपिल पाटील यांना मंत्रिपद देत नरेंद्र मोदी यांनी शिवसेनेला शह देण्यासाठी मास्टरस्ट्रोक खेळला असल्याचं बोललं जात आहे.
नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात नारायण राणे, कपिल पाटील, भारती पवार आणि भागवत कराड या चौघांना संधी देण्यात येत आहे. नारायण राणे आणि कपिल पाटील यांना मंत्रिपद देत कोकण पट्ट्यातील शिवसेनेच्या गडाला सुरूंग लावण्याचे प्रयत्न भाजपने सुरू केले असल्याचं बोललं जात आहे. नारायण राणे आणि कपिल पाटील यांना मंत्रिपद दिल्याने भाजपची कोकण किनारपट्टीवर ताकद वाढवण्याची योजना आखण्यात आली आहे.
Union Cabinet Expansion: मोदींच्या मंत्रिमंडळात 'या' 43 जणांना लॉटरी, पाहा संपूर्ण यादी
काय होतील राजकीय समीकरण?
कोकणात एकूण 11 खासदार आणि 66 आमदार येतात. यात आगरी कार्ड राजकारण खेळायला भाजपने सुरवात केली आहे. यापूर्वी गणेश नाईक, मंदा म्हात्रे यांना समोर ठेऊन आगरी कार्ड सुरू झालं. नंतर रामशेठ ठाकूर आणि प्रशांत ठाकूर याना घेत विस्तार सुरू केला. उरणमध्ये विवेक पाटील यांच्यावर ईडीचा अंकुश ठेऊन उरणमध्ये महेश बालदी यांना निवडून आणलं. आता हाच विस्तार वाढवण्यासाठी आता शेकापचे शिक्षक आमदार बलराम पाटील यांच्या मागे कारवाईचा सिसेमेरा सुरू तिकडे शेकाप जयंत पाटील आर्थिक अडचणीत आहेत.
मंत्रिमंडळ विस्तारात 13 वकील, 6 डॉक्टर, 5 इंजिनिअर; अल्पसंख्याक समाजालाही मिळणार मंत्रिपदं
आगरी-मराठा कार्ड
नारायण राणे यांना मंत्रिपद देत सिंधुदुर्ग, रत्नागिरीत शिवसेनेच्या गडाला सुरूंग लावण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. तर कपिल पाटील यांना मंत्रिपद देत आगरी कार्ड खेळलं जात आहे. रायगड, नवी मुंबई महापालिका, ठाणे महापालिका, भिवंडी-निझामपूर महानगरपालिका, कल्याण डोंबवली महापालिकेसाठी आवश्यक आहे. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघर, पनवेल कल्याण डोंबिवली या भागांत आगरी समाजाचे मतदान मोठं आहे. या ठिकाणी शिवसेनेला शह देण्यासाठी भाजपचं आगरी कार्ड खूप महत्त्वाचे ठरणार आहे. यापूर्वीच नवी मुंबई एअरपोर्टचा विषय घेऊन भाजपने हे काम सुरू केलं आहे.
भाजपला कोकण बेल्ट का हवाय?
आगामी 10 वर्षात सर्वात मोठा औद्योगिक पट्टा तयार होणार आहे. वैचारीक विरोध असणारा शेकापला उतरती कळा लागली आहे. त्यामुळे आता ठाण्यासह कोकणात मजबूत असलेला शिवसेनेच्या गडाला सुरूंग लावत या भागात आपलं संपूर्ण वर्चस्व मिळवण्यास भाजपने सुरुवात केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Narendra modi, Shiv sena, Union cabinet