Home /News /mumbai /

Union Cabinet Expansion: प्रीतम मुंडेंचं मंत्रिपद हुकलं, पंकजाताई tweet करून म्हणाल्या...

Union Cabinet Expansion: प्रीतम मुंडेंचं मंत्रिपद हुकलं, पंकजाताई tweet करून म्हणाल्या...

'खासदार प्रीतम मुंडे दिल्लीत दाखल झाल्याची बातमी मी स्वतः पाहिली ती बातमी चुकीची आणि खोटी आहे'

    मुंबई, 07 जुलै: मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात (Union Cabinet Expansion) कुणा-कुणाला संधी मिळणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. महाराष्ट्रातून चार नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाणार हे आता निश्चित झाले आहे. पण, बीडच्या खासदार डॉ.प्रीतम मुंडे  (Pritam Munde) यांची संधी मात्र हुकली आहे. खुद्द पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी ट्वीट करून या वृताला दुजोरा दिला आहे. प्रीतम मुंडे यांनी मंत्रिपद मिळणार अशी शक्यता होती. पण, त्यांचे नाव वगळण्यात आले आहे. मराठवाड्यातून भागवत कराड यांनी मंत्रिपदाची लॉटरी लागली आहे. पंकजा मुंडे या नवी दिल्ली दाखल झाल्यात असे वृत्त दाखवण्यात आले होते. पण, पंकजा मुंडे यांनी ट्वीट करून हे वृत्त खोटे असल्याचे सांगितले. 'खासदार प्रीतम मुंडे दिल्लीत दाखल झाल्याची बातमी मी स्वतः पाहिली ती बातमी चुकीची आणि खोटी आहे. मी प्रीतम ताई आम्ही सर्व कुटुंबीय आमच्या मुंबईच्या निवासस्थानी आहोत' असं पंकजा मुंडे यांनी सांगितलं. 'धर्मेंद्र ते विद्या बालन;'दिलीप कुमारांच्या अंत्यदर्शनासाठी सेलेब्रेटींची गर्दी ओबीसी नेतृत्व कायम राखण्यासाठी प्रीतम मुंडे यांना मंत्रिपद दिलं जाईल, असं समिकरण तयार झालं होतं. पण, त्यांच्या ऐवजी मराठवाड्यातून डॉ. भागवत कराड यांना मंत्रिपद दिले जाणार हे निश्चित झाले आहे. भागवत कराड हे वंजारी समाजाचे नेतृत्व करतात. त्यामुळे घराणेशाहीला थारा न देता नव्या चेहऱ्याला संधी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, भागवत कराड हे औरंगाबादचे माजी महापौर राहिले होते. त्यांची राज्यसभेत खासदार म्हणून निवड झाली आणि आता थेट मंत्रिपदी वर्णी लागली आहे. तर दुसरीकडे, प्रीतम मुंडे यांनी लोकसभा निवडणूक लढवून खासदारकीची दुसरी टर्म पूर्ण करत आहे. महाराष्ट्रातून या नेत्यांना मिळणार मंत्रिपद? - भागवत कराड - भारती पवार - नारायण राणे - कपिल पाटील दानवे-संजय धोत्रेंचा राजीनामा केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार आज संध्याकाळी 6 वाजता होणार आहे. तर 8 -12 जणांची मंत्रिमंडळातून उचलबांगडी होणार आहे. यामध्ये भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचा समावेश आहे. रावसाहेब दानवे यांचा दोनवेळा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला होता. त्यांच्याकडे ग्राहक संरक्षण आणि अन्न पुरवठा राज्यमंत्रिपदाचा कार्यभार सोपवण्यात आला होता. 13 वर्षीय मुलीनं बाळाला दिला जन्म; वर्गमित्रानं ब्लॅकमेल करत केला होता बलात्कार अखेर, नव्या मंत्रिमंडळ विस्तारातून दानवेंची पंख छाटण्यात आले आहे. त्यांच्याबरोबर अकोल्याचे खासदार संजय धोत्रे यांच्याही राज्यमंत्रिपदाचा राजीनामा घेण्यात आला आहे. पंतप्रधान मोदींनी बैठक घेतल्यानंतर मंत्र्यांचे राजीनामे घेण्यास सुरुवात केली आहे. आणखी काही मंत्र्यांचे राजीनामे दिले जाणार आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    Tags: Maharashtra, Mumbai, Pankaja munde

    पुढील बातम्या