Ulhasnagar : सलग तीन वर्षे मारणार चप्पल, कोरोना काळात गायब आमदाराला भाजपच्या माजी प्रवक्त्यांचा इशारा

Ulhasnagar : सलग तीन वर्षे मारणार चप्पल, कोरोना काळात गायब आमदाराला भाजपच्या माजी प्रवक्त्यांचा इशारा

Ulhasnagar आयलानी यांची आमदारकीची मुदत अजून तीन वर्षे आहे. तर आमच्याकडे कोरोना काळात पिचलेले एक हजार नागरिक आहेत. ते दररोज त्यांना दिसतील तिथे चप्पल मारतील असा इशारा वादवा यांनी दिला.

  • Share this:

उल्हासनगर, 9 मे : उल्हासनगर (Ulhasnagar) मतदारसंघाच्या आमदाराला (MLA) सलग तीन वर्ष दररोज चप्पल मारण्याचा इशारा भाजपचे माजी प्रवक्ते राम वादवा (Ram Wadhwa) यांनी दिलाय. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी नड्डा (J.P.Nadda) आणि चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांना वादवा यांनी या संबंधीचं ट्विटही केलंय. उल्हासनगर मतदार संघाचे भाजपा आमदार कुमार आयलानी (Kumat Ailani) आहेत. पण कोरोना काळात लोकांना मदत करण्याऐवजी ते लोणावळा येथील रिसॉर्टवर परिवारासह जाऊन वेळ घालवतात. नागरिकांच्या अडचणींकडे त्यांचं लक्ष नाही, अशा आरोप करद वादवा यांनी हा इशारा दिला आहे.

आमदार कुमार आयलानी यांना सात दिवसांची मुदत देत आहोत,  सात दिवसात त्यांनी लोकांच्या घरोघरी जाऊन समस्या जाणून घ्याव्या. नसता आठव्या दिवसापासून सलग तीन वर्ष त्यांना दररोज कोणीतरी चप्पल मारेल असं वादवा म्हणाले. आयलानी यांची आमदारकीची मुदत अजून तीन वर्षे आहे. तर आमच्याकडे कोरोना काळात पिचलेले एक हजार नागरिक आहेत. ते दररोज त्यांना दिसतील तिथे चप्पल मारतील असा इशारा वादवा यांनी दिला.

(वाचा-पुणे जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार; शॉटकटच्या नादात आजोबा-नातीचा दुर्देवी मृत्यू)

वादवा हे पूर्वी उल्हासनगर भाजपाचे प्रवक्ते होते, मात्र आता ते कोणत्याही पक्षात नाहीत. यावर जर हिम्मत असेल तर मी रस्त्यावर एकटा फिरतो त्यांनी यावे असे प्रतिउत्तर आमदार कुमार आयलानी यांनी दिले आहे. तसेच या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार करणार असून याबाबत पक्षातील वरिष्ठ नेत्यांनाही सांगणार असल्याचं आमदार आयलानी यांनी म्हटलं आहे. या प्रकारामुळं उल्हासनगर शहरातील राजकीय वातावरण तापले असून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार आहे.

(वाचा-Coronavirus : राज्यातील आकडे दिलासादायक, मुंबईत रुग्णसंख्या झपाट्याने घटली)

कुमार आयलानी म्हणाले की, लोकांनी मला निवडून दिले आहे. शिवाय मी त्यांची नियमित कामं करतो. माझ्या कार्यालयात रेशन कार्ड, आधार कार्ड यासाठी आणि अपंगांच्या कामासाठी रोज शेकडो लोक येतात. शिवाय माझ्या कार्यालयात मी रोज सकाळी 11 ते 4 वाजेपर्यंत नागरिकांच्या समस्या आणि अडीअडचणीसाठी उपलब्ध असतो. त्यामुळं ज्यानं हा इशारा दिला आहे त्याचं शहरात अस्तित्व काहीच नाही. मी आशा इशाऱ्याला घाबरत नाही असंही आयलानी म्हणाले. त्यामुळं भाजपचे आजी माजी पदाधिकारी एकमेकांसमोर उभे ठाकल्यानं उल्हासनगरमध्ये विरोधकांना टीकेची आयती संधी मिळणार आहे.

Published by: Meenal Gangurde
First published: May 9, 2021, 10:51 PM IST

ताज्या बातम्या