मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

रत्नागिरीत 600 कुटुंबांवर बेरोजगारीची टांगती तलवार; RGPPL कंपनीसमोरही मोठं आव्हान

रत्नागिरीत 600 कुटुंबांवर बेरोजगारीची टांगती तलवार; RGPPL कंपनीसमोरही मोठं आव्हान

परिणामी 600 स्थानिक कुटुंबांवर बेरोजगारीचे संकट ओढवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

परिणामी 600 स्थानिक कुटुंबांवर बेरोजगारीचे संकट ओढवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

परिणामी 600 स्थानिक कुटुंबांवर बेरोजगारीचे संकट ओढवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

रत्नागिरी, 8 डिसेंबर : भारतातील सर्वात मोठ्या (Ratnagiri News) रत्नागिरी गॅस आणि वीज निर्मिती (Ratnagiri Gas and Power Generation Project) प्रकल्पात अपूऱ्या गॅस पुरवठ्यामुळे केवळ 200 मेगावॅट वीज निर्मिती सुरु आहे. 1964 मेगावॅटची क्षमता असलेल्या आरजीपीपीएलकडे मार्च 2022 नंतर वीज खरेदीदार नसल्याने या प्रकल्पाचे भविष्य अंधारमय आहे, असं सांगितलं जात आहे.

परिणामी 600 स्थानिक कुटुंबांवर बेरोजगारीचे संकट ओढवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. प्रकल्पात भागीदारी असलेल्या महाराष्ट्र शासनाने या प्रकल्पातून वीज घ्यावी यासाठी कंपनी व्यवस्थापन प्रयत्नशील आहे. सध्याच्या परिस्थितीत महाराष्ट्र शासन आरजीपीपीएलकडून वीज खरेदी करत नसल्यामुळे कंपनीसमोर मोठं आव्हान तयार झालंय. 1964 मेगावॅट वीज निर्मिती क्षमता असलेली RGPPL कंपनीमध्ये मागील तीन महिन्यापासून केवळ 220 मेगावॅट इतकीच वीजनिर्मिती होत आहे.

सध्या RGPPL चे रेल्वे सोबत करार असल्यामुळे ही वीज निर्मिती जबरदस्तीने सुरू असल्याचे सांगत येत्या मार्च 2022 मध्ये हा करार संपुष्टात येणार असल्याची माहिती कंपनीचे कार्यकारी अधिकारी असिमकुमार सामंता यांनी पत्रकार परिषदेत दिली. देशात उत्पादित होणाऱ्या नैसर्गिक वायुचा वापर प्राधान्याने खतनिर्मिती, घरगुती गॅस आणि वाहनांसाठी इंधन म्हणून केला जातो. त्यामुळे प्रतिदिन 1964 मेगावॅट वीजनिर्मितीसाठी आवश्यक 8.5 एमएमएससीएमडी गॅस आरजीपीपीएलला मिळत नाही.

भारतीय रेल्वेला 500 मेगावॅट वीज देण्यासाठी आवश्यक गॅसही मिळत नसल्याने सध्या आरजीपीपीएल अन्य कंपन्यांनाकडून वीज विकत घेऊन हा करार पूर्ण करत आहे. मार्च 2022 मध्ये हा करार संपल्यावर आरजीपीपीएलकडे वीजेचा खरेदीदारच नाही. त्यामुळे वीज उत्पादन होत नसल्याने कंपनीचे भवितव्य अंधारात आहे. नैसर्गिक गॅसवर आधारीत आरजीपीपीएलमध्ये कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण नगण्य आहे.

उष्णता कमी प्रमाणात बाहेर पडते. अन्य वीज कंपन्यांच्या तुलनेत अत्यंत कमी जागेत प्रकल्प आहे. गॅसबरोबरच वाफेवर टर्बाईन चालविण्याचे तंत्र असलेला हा एकमेव प्रकल्प आहे. रेन हार्वेस्टिंगचे पाण्यावर प्रकल्प चालतो. ही वैशिष्ट्ये असलेला हा प्रकल्प बंद होणे हे देशाचे नुकसान आहे. आज प्रकल्पामध्ये गुहागर परिसरातील सुमारे 600 स्थानिक कामगार आहेत. प्रकल्प बंद पडल्यास त्याचा परिणाम थेट या 600 कुटुंबांवर होणार आहे.

हे ही वाचा-Bank Jobs: मुंबईच्या युनियन बँक ऑफ इंडियामध्ये 'या' पदांसाठी होणार भरती

याशिवाय वाहन पुरवणारे, बांधकाम करणारे, कॉलनीमध्ये साफसफाई करणारे असे अनेक ठेकदारांचे व्यवसाय बंद होतील. त्यामुळे त्याची आर्थिक झळ थेट स्थानिकांना बसणार आहे. वीजनिर्मिती करण्यासाठी पूर्वी डोमेस्टिक गॅसचा पुरवठा होत असे, मात्र सरकारच्या बदलेल्या धोरणामुळे डोमेस्टिक गॅस सध्या कंपनीला मिळत नसल्यामुळे कंपनीला गॅस इंपोर्ट करावा लागतोय. परिणामी वीजनिर्मिती खर्चात अपेक्षेपेक्षा जास्त वाढ झाली आहे आणि याचा थेट परिणाम वीज विक्रीवर होतो आहे.

आम्हाला 3 डॉलर प्रति बॅरेल अपेक्षित असलेला दर सध्या 8 डॉलरपेक्षाही जास्त किमतीने मिळत आहे. यामुळे कंपनीचे संपूर्ण बजेट बदलून गेलंय. कंपनी सुरू ठेवण्यासाठी आता ग्राहक मिळणं अत्यंत गरजेचे असून राज्य सरकारने त्याच्या करारानुसार वीज विकत घ्यावी असे आवाहन कंपनी व्यवस्थापन करत आहे.  मार्च 2022 नंतर रेल्वेकडूनही करार वाढवला जावा यासाठी चर्चा सुरू असून अनेक बड्या कंपन्या, आणि गुजरात सरकार सोबत त्यासंदर्भात पत्रव्यवहार केल्याचेही सामंता यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

भारतातील सर्वात मोठा, पर्यावरणपुरक, प्रदुषणविरहीत वीज प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालणे आवश्यक आहे. आम्ही अशा करतो की, केंद्र आणि राज्य सरकारबरोबरच कोकणातील लोकप्रतिनिधी यासाठी पुढे येथील. हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालल्यास रत्नागिरी जिल्ह्याच्या विकासाला मोठी चालना मिळेल, असे असीमकुमार सामंता (मुख्य कार्यकारी अधिकारी आरजीपीपीएल) यांनी सांगितलं.

First published:

Tags: Job, Ratnagiri